पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्र. मुख्याध्यापिका सौ.अर्चना सावंत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सम्मानीत

अंबाजोगाई(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघ द्वारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार समारोह 19 व 20 मे 2022 पाचगनी जि.सातारा येथे संपन्न झाला. यावेळी अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली जि.प. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. अर्चना सावंत यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दाखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. या समारोहा साठी महाराष्ट्रातुन कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी विषय शिकवणारे अध्यापक मोठया संख्येने सहभागी झाले होते...या कार्यक्रमास राज्य अध्यक्ष डाॅ.मिलिंद कांबळे(बारामती), राज्य सचिव प्रा.रेवननाथ कर्डिले(पुणे), प्रा.काशीकर(पुणे), डाॅ.राजकुमार कांबळे(आम्बाजोगाई)यांच्या उपस्थिती होती. राज्यस्तरीय पुरस्कार मिळालया बद्द्ल अर्चना सावंत यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

पाण्यात बुडून बाप लेकाचा मृत्यू,वडगाव शिवारातील घटना

इमेज
परळी, (प्रतिनिधी):- पाणी आणण्यासाठी विहिरीजवळ गेलेल्या ५८ वर्षीय इसम पायघसरून पडल्याने त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या २५ वर्षीय मुलाने विहिरीत उडी घेतली एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघेही बाप लेक बुडाल्याची घटना दि.१३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता तालुक्यातील वडगाव शिवारात घडली. याबाबत ग्रामीण पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की परळी शहरातील बरकत नगर मध्ये राहणारे शेख सादेक शेख हमीद वय ५८ वर्ष हे वडगाव शिवारातील विहिरीवर पाण्यासाठी गेले असता पायघसरून ते विहिरीत पडले त्यांना वाचण्यासाठी त्यांचा मुलगा शेख रफिक शेख सादेक वय २५ याने विहिरीत उडी मारली दोघेही बुडत असल्याचे पाहून त्यांचा दुसरा मुलगा शेख साजिद शेख सादेक वय ३० हा वाचवण्यासाठी गेला असता तो ही बुडत असल्याचे पाहून त्याच्या आईने विहिरीत दोर टाकून त्याला वाचवले या घटनेत बाप लेकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली .विहिरीतून बाहेर काढण्यासाठी सपोनी मारोती मुंडे व त्यांचा स्टाप तसेच गावकरी व इतर शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. अंधार असल्यामुळे मदत करण्यास अडचणी येत आहेत.