पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परळी मतदार संघातील मूर्ती गावात गावगुंडांनी दुचाकी जाळल्या

  राजेभाऊ फड यांनी भेट घेऊन दिला धीर; दादागिरी खपवून न खेण्याचा दिला इशारा परळी (प्रतिनिधी) परळी विधानसभा मतदारसंघात कायम दहशतीचे आणि दादागिरीचे वातावरण असल्याचे सर्वश्रुत आहे. येथील जनतेला नेहमीच अन्याय आणि अत्याचाराला सामोरे जावे लागते. लोकसभेच्या निवडणुकीत विरोधात प्रचार केला म्हणून काहींच्या गाड्या जाळण्यात आल्या असून, गड्याबरोबर तुलाही जाळून टाकू अशी धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मूर्ती येथील देविदास फड आणि अरुण फड या दोघा सख्ख्या भावांच्या दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला आहे. कृषिमंत्री आणि पालकमंत्री यांच्या गावगुंडांनी दहशत माजविणारा हा प्रकार केला असून अशी दादागिरी यापुढे चालू दिली जाणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते राजेभाऊ फड यांनी दिला आहे. मूर्ती येथे जाऊन त्यांनी फड कुटुंबाची भेट घेत त्यांना धीर दिला. परळी मतदारसंघातील मूर्ती या गावचे देविदास बालासाहेब फड व अरुण बालासाहेब फड हे दोन बंधू नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बूथ प्रमुख झाल्याने कृषिम...