पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पैटण येथे सौ.सुकुमार नंदकुमार काटे यांचे निधन

इमेज
केज प्रतीनीधी केजतालुक्यातील पैठण येथील सौ सुकुमार काटे यांचे दि 11रोजी संध्याकाळी 11वाजता अंबाजोगाई शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना नीधन झाले काहि दिवसापूर्वी त्यांना कोरोना ची लागन झाल्याचे लक्षात येताच दवाखान्यात दाखल केले त्यांनी कोरोना वर  मात केली पन इतर दुर्धर आजाराची लागन झाली त्यावर मात करन्यात अयशस्वी झाल्या. त्यांच्या जान्याने पुर्ण गाव शोकसागरात बुडाला त्यांच्या पश्चात पती एक अविवाहित मुलगा विवाहित मुलगी व मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कार नंतर राख गंगेत किंवा नदित न टाकता खड्डे खनुन तीन अंब्याची झाडे लाउन त्यांना आदरांजली वाहत कुटीबीयांनी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश जनतेला दिला .

भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने माऊली गडदे यांचा सत्कार संपन्न

इमेज
परळी वैजनाथ : तालुक्यातील बोधेगाव येथे पाण्याच्या ओढत अडककेल्या लोकांना जीवदान देणारे बोधेगाव माजी सरपंच माऊली गडदे यांचा भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. परळी वैजनाथ तालुक्यातील बोधेगाव येथे दिनांक 2 मे बुधवार रोजी रात्री ओढ्याच्या पाण्यात अडकलेल्या बोलेरो गाडीतील दोन महिला पाच दिवसाचे बाळ आणि बोलरोचा ड्रायव्हर या चौघांना आपला स्वतः चा जीव धोक्यात घालून गावकऱ्यांच्या मदतीने प्राण वाचवणारे बोधेगावचे माजी सरपंच तथा परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य माऊली गडदे यांचा भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने शिवसेना जिल्हा उपप्रमुख,तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार ठक्कर,भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे,माजी उप शहर प्रमुख सतिष जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, उप शहर प्रमुख किशन बुंदेले, भारतीय विद्यार्थी सेना तालुका समन्वयक अमित कचरे,शहर प्रमुख गजानन कोकीळ,बाळासाहेब सातपुते,प्रल्हाद नरवटे,विशाल जगताप हे उपस्थित होते.

केज तालुक्यातील आनंदगावची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल

इमेज
केज दि ५(प्रतिनिधी) तालुक्यातील आनंदगाव येथे ग्रामपंचायत नियोजित कोव्हिड ॲन्टिजन टेस्ट कँप घेण्यात आला यामध्ये व्यपारी व गावातील संशयीत तसेच संपर्कातील व्यक्तिंच्या तपासण्या करण्यात आल्या. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.साखळी तुटून गावात यापुढे रुग्ण आढळून येऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले. तपासणी वेळी जि.प सदस्य डॉ. योगिनीताई थोरात,सरपंच गणेश राऊत, उपसरपंच अशोक भोगजकर ,तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत सौदागर,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्रीराम गायकवाड, ग्रामसेवक बी एन रोडगे , तलाठी श्रीमती वाघमारे,कृषी सहायक सतीश नारायणकर,जि प शाळेचे मुख्याध्यापक श्री वाळके ,श्री शिंदे , श्री मुंडे आरोग्य सेवक श्री बोराडे , आशाताई ,अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या

मराठवाडा विभाग माहिती संचालकपदाचा हेमराज बागुल यांनी स्वीकारला कार्यभार

इमेज
औरंगाबाद, दि.04, (वि.मा.का.) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक म्हणून हेमराज बागुल यांनी आज येथे (दि.04) रोजी अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. श्री. बागुल हे सध्या नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी मराठवाडा विभागाच्या माहिती संचालकपदाची सुत्रे श्री.राधाकृष्ण मुळी यांच्याकडे होती. त्यांच्या निवृत्तीमुळे दि.31 मे 2021 रोजी हे पद रिक्त झाले होते. खडकेश्वर येथील संचालक कार्यालयात आज श्री. हेमराज बागुल यांचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सहायक संचालक प्रमोद धोंगडे, माहिती अधिकारी वंदना थोरात, सहायक संचालक मीरा ढास, माहिती सहायक संजीवनी जाधव पाटील, श्याम टरके, रेखा पालवे आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री.बागुल यांनी मराठवाडा विभागातील आठही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधून कामकाजाचा आढावा घेतला. श्री.बागुल यांनी यापूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून तसेच महासंचालनालयातील लोकराज्य, महान्यू...