भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने माऊली गडदे यांचा सत्कार संपन्न

परळी वैजनाथ : तालुक्यातील बोधेगाव येथे पाण्याच्या ओढत अडककेल्या लोकांना जीवदान देणारे बोधेगाव माजी सरपंच माऊली गडदे यांचा भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. परळी वैजनाथ तालुक्यातील बोधेगाव येथे दिनांक 2 मे बुधवार रोजी रात्री ओढ्याच्या पाण्यात अडकलेल्या बोलेरो गाडीतील दोन महिला पाच दिवसाचे बाळ आणि बोलरोचा ड्रायव्हर या चौघांना आपला स्वतः चा जीव धोक्यात घालून गावकऱ्यांच्या मदतीने प्राण वाचवणारे बोधेगावचे माजी सरपंच तथा परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य माऊली गडदे यांचा भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने शिवसेना जिल्हा उपप्रमुख,तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार ठक्कर,भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे,माजी उप शहर प्रमुख सतिष जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, उप शहर प्रमुख किशन बुंदेले, भारतीय विद्यार्थी सेना तालुका समन्वयक अमित कचरे,शहर प्रमुख गजानन कोकीळ,बाळासाहेब सातपुते,प्रल्हाद नरवटे,विशाल जगताप हे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे

परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही