पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बीड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व पोस्ट ऑफिसेस होणार CSC केंद्र

इमेज
बीड,दि. 07 (जिमाका):- भारतीलय डाक विभाग व डीजीटल सेवा पोर्टल यांच्या संयुक्त विद्यमाने डीजीटल इंडिया प्रोग्रामला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारतीय डाक विभाग लवकरच बीड जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिस मध्ये CSC (Commn Servies Centre) सेवा उपलब्ध करणार आहे. CSC (Commn Servies Centre) च्या माध्यमातून नागरिकांसाठी खालील सेवा शासनाने ठरवलेल्या दराने पुरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत बीड डाक विभागाने 257 कर्मचारी यांची यादी तयार केली आहे. सदर कर्मचारी मागणी नुसार ई आरक्षित रेल्वे तिकीट, जीवन प्रमाण, जीवन सामान्य विमा प्रीमियम कलेक्शन, आयुष्मान भारत, प्रधान मंत्री लघू व्यापारी मानधन योजना, गैस कनेक्शन ( बुकिंग) आणि लाईट बील, मोबाईल बील, ई श्रम नोंदणी, प्रधान मंत्री विमा योजना न्यू पेन्शन स्कीम फास्ट टॅग इत्यादी सेवा प्रदान करतील. बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी वरील सेवांचा शासनाने ठरवलेल्या दर प्रमाणे लाभ घ्यावा. असे आवाहन अधीक्षक डाकघर, एस.एम.अली डाक विभाग बीड यांनी केले आहे.

मंगळवार दि.८ रोजी शिवाजी नगर (नाथ टॉकीज परिसर) येथे मारोती मंदिर चा "प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन समारंभ"चे आयोजन . ;भाविकांनी उपस्थित रहावे-प्रा पवन मुंडे.

इमेज
परळी प्रतिनिधी : शहरातील शिवाजी नगर,नाथ टॉकीज मागे येथे आज इच्छापूर्ती हनुमान मंदिर ट्रस्ट च्या वतीने येथील मारोती मंदिर च्या "प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन समारंभ" आयोजित केला असून,कार्यक्रमास शहरातील भाविक-भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवाजी नगर मित्र मंडळ व नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे. प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन समारंभ प्रसंगी आज सकाळी 8 वाजता प्रभू हनुमानाच्या नवीन मूर्ती ची शोभा यात्रा काढण्यात येणार असून तद्नंतर विधिवत पूजा करून मूर्ती ची मंदिरात स्थापना करण्यात येणार असून या वेळी दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान ह.प.भ.विजयानंद महाराज आघाव, दौणापूरकर यांचे कीर्तन होणार असून किर्तनानंतर महाप्रसाद चा कार्यक्रम होणार आहे.तरी परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवाजी नगर मित्र मंडळ व नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे.

मांडवा येथे श्री काळभैरव यात्रा व कलशारोहन सोहळ्या निमित्त भव्य श्रीरामकथा व ज्ञानयज्ञचे आयोजन

इमेज
परळी प्रतिनिध ी परळी तालुक्यातील मांडवा येथे मार्गशिष पोर्णिमेला काळभैरवाची मोठी यात्रा भरते.या यात्रेला दरवर्षी मराठावाड्यासह आंध्र प्रदेश ,तेलंगणा आदी परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. आंध्रप्रदेशातील लभान समाजातील भाविक काळभैरवाला आपले कुलदैवत मानत असल्याने मोठ्या प्रमाणात हे भाविक यात्रेस आवर्जून उपस्थित राहतात. मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्याने यंदा भव्य यात्रोत्सव व कलशारोहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात दि.१३ डिसेंबर ते दि.१८ डिसेंबर दरम्यान दररोज सकाळी ९ ते ११ महायज्ञ व दु.१ ते ४ वा रामयनाचार्य ह.भ.प श्री.रामरावजी महाराज ढोक, नागपूरकर यांच्या रामकथेचे आयोजन आणि दररोज रात्रौ ९ ते ११ या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भव्य यात्रोत्सव व पालखी मिरवणूक होईल व दि.१९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कलश प्रदक्षिणा व कलशारोहन तर दु. १२ ते २ वाजता ह.भ.प श्री.रामरावजी महाराज ढोक यांच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाचा समारोप होईल. कार्यक्रमादरम्यान दररो...