मांडवा येथे श्री काळभैरव यात्रा व कलशारोहन सोहळ्या निमित्त भव्य श्रीरामकथा व ज्ञानयज्ञचे आयोजन

परळी प्रतिनिधी परळी तालुक्यातील मांडवा येथे मार्गशिष पोर्णिमेला काळभैरवाची मोठी यात्रा भरते.या यात्रेला दरवर्षी मराठावाड्यासह आंध्र प्रदेश ,तेलंगणा आदी परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. आंध्रप्रदेशातील लभान समाजातील भाविक काळभैरवाला आपले कुलदैवत मानत असल्याने मोठ्या प्रमाणात हे भाविक यात्रेस आवर्जून उपस्थित राहतात. मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्याने यंदा भव्य यात्रोत्सव व कलशारोहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात दि.१३ डिसेंबर ते दि.१८ डिसेंबर दरम्यान दररोज सकाळी ९ ते ११ महायज्ञ व दु.१ ते ४ वा रामयनाचार्य ह.भ.प श्री.रामरावजी महाराज ढोक, नागपूरकर यांच्या रामकथेचे आयोजन आणि दररोज रात्रौ ९ ते ११ या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भव्य यात्रोत्सव व पालखी मिरवणूक होईल व दि.१९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कलश प्रदक्षिणा व कलशारोहन तर दु. १२ ते २ वाजता ह.भ.प श्री.रामरावजी महाराज ढोक यांच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाचा समारोप होईल. कार्यक्रमादरम्यान दररोज महाप्रसाद व कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी भव्य यात्रोत्सव व श्रीरामकथा श्रावणाचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मंगेश फड यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे

परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही