बीड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व पोस्ट ऑफिसेस होणार CSC केंद्र
बीड,दि. 07 (जिमाका):- भारतीलय डाक विभाग व डीजीटल सेवा पोर्टल यांच्या संयुक्त विद्यमाने डीजीटल इंडिया प्रोग्रामला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारतीय डाक विभाग लवकरच बीड जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिस मध्ये CSC (Commn Servies Centre) सेवा उपलब्ध करणार आहे. CSC (Commn Servies Centre) च्या माध्यमातून नागरिकांसाठी खालील सेवा शासनाने ठरवलेल्या दराने पुरवण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत बीड डाक विभागाने 257 कर्मचारी यांची यादी तयार केली आहे. सदर कर्मचारी मागणी नुसार ई आरक्षित रेल्वे तिकीट, जीवन प्रमाण, जीवन सामान्य विमा प्रीमियम कलेक्शन, आयुष्मान भारत, प्रधान मंत्री लघू व्यापारी मानधन योजना, गैस कनेक्शन ( बुकिंग) आणि लाईट बील, मोबाईल बील, ई श्रम नोंदणी, प्रधान मंत्री विमा योजना न्यू पेन्शन स्कीम फास्ट टॅग इत्यादी सेवा प्रदान करतील. बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी वरील सेवांचा शासनाने ठरवलेल्या दर प्रमाणे लाभ घ्यावा. असे आवाहन अधीक्षक डाकघर, एस.एम.अली डाक विभाग बीड यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा