नाथ प्रतिष्ठाणच्या दांडिया उत्सवाची उत्साहात सांगता; डॉ.प्रियाताई नागरगोजे यांनी जिंकली ऍक्टिव्हा!
मनीषाताई चाटे यांना डबलडोरचा फ्रीज तर नंदिनीताई गजभार यांनी जिंकली वॉशिंग मशीन परळी वैद्यनाथ (दि. 24) - ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे आणि ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली नाथ प्रतिष्ठाण आयोजित दांडिया महोत्सवाची सोमवारी रात्री मोठ्या उत्साहात सांगता झाली. महिला मंडळींमध्ये हा महोत्सव संपूच नये अशी भावना दिसून येत होती. दांडिया महोत्सव व होम मिनिस्टर स्पर्धच्या शेवटी अनेक आकर्षक बक्षिसे विजेत्या महिलांना देण्यात आली. तर पहिले प्रमुख बक्षीस ऍक्टिव्हाच्या विजेत्या परळी शहरातील डॉ.प्रियाताई नागरगोजे या ठरल्या. डबल डोर फ्रिज या दुसऱ्या बक्षिसाच्या मनीषाताई चाटे तर वॉशिंग मशीनच्या विजेत्या नंदिनीताई गजभार या ठरल्या. याशिवाय गॅस शेगडी, मिक्सर, ज्युसर, अशी अनेक आकर्षक बक्षिसे सहभागी महिलांना देण्यात आली. यावेळी सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे यांच्यासह प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसले, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे तसेच सौ.मनीषाताई अजय मुंडे, सौ.प्राजक्ताताई श्रीकृष्ण (भाऊड्या) कराड, अर्चनाताई रोडे, वर्षाताई दहिफळे यांसह महिला भगिनी व तरुणी मोठ्या संख...