नाथ प्रतिष्ठाणच्या दांडिया उत्सवाची उत्साहात सांगता; डॉ.प्रियाताई नागरगोजे यांनी जिंकली ऍक्टिव्हा!

मनीषाताई चाटे यांना डबलडोरचा फ्रीज तर नंदिनीताई गजभार यांनी जिंकली वॉशिंग मशीन

परळी वैद्यनाथ (दि. 24) - ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे आणि ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली नाथ प्रतिष्ठाण आयोजित दांडिया महोत्सवाची सोमवारी रात्री मोठ्या उत्साहात सांगता झाली. महिला मंडळींमध्ये हा महोत्सव संपूच नये अशी भावना दिसून येत होती.

दांडिया महोत्सव व होम मिनिस्टर स्पर्धच्या शेवटी अनेक आकर्षक बक्षिसे विजेत्या महिलांना देण्यात आली. तर पहिले प्रमुख बक्षीस ऍक्टिव्हाच्या विजेत्या परळी शहरातील डॉ.प्रियाताई नागरगोजे या ठरल्या. डबल डोर फ्रिज या दुसऱ्या बक्षिसाच्या मनीषाताई चाटे तर वॉशिंग मशीनच्या विजेत्या नंदिनीताई गजभार या ठरल्या. याशिवाय गॅस शेगडी, मिक्सर, ज्युसर, अशी अनेक आकर्षक बक्षिसे सहभागी महिलांना देण्यात आली.

यावेळी सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे यांच्यासह प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसले, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे तसेच सौ.मनीषाताई अजय मुंडे, सौ.प्राजक्ताताई श्रीकृष्ण (भाऊड्या) कराड, अर्चनाताई रोडे, वर्षाताई दहिफळे यांसह महिला भगिनी व तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून यासारखे उपक्रम सातत्याने व आणखी भव्य स्वरूपात आयोजित केले जातील, असे याप्रसंगी बोलताना सौ.राजश्रीताई म्हणाल्या. अभिनेत्री रुपाली भोसले, संकर्षण कऱ्हाडे यांच्या उपस्थितीने वातावरणात एक वेगळाच उत्साह भरला होता. या 9 दिवसात परळीकर महिलांनी दांडिया उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. संपूर्ण 9 दिवसांच्या विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका शोभाताई कुलकर्णी यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भाऊड्या कराड यांच्यासह नाथ प्रतिष्ठाणच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे

परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही