पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या एल्गार महासभेस उपस्थित राहणार - धनंजय मुंडे

इमेज
  परळी (प्रतिनिधी) - बीड शहरात येत्या १७ ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी समता परिषदेचे संस्थापक तथा ज्येष्ठ नेते मंत्री, छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या महा एल्गार सभेचे निमंत्रण मिळाले असून, आपण या एल्गार महासभेस उपस्थित राहणार असल्याचे माजी मंत्री तथा ओबीसी नेते धनंजय मुंडे यांनी परळी येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.  समता परिषदेचे नेते तथा कार्यक्रमाचे आयोजक ॲड. सुभाष राऊत यांनी परळी येथे आपली भेट घेऊन सभेचे निमंत्रण दिले असून, मंत्री छगन भुजबळ यांनी देखील दूरध्वनीवरून संपर्क साधत या सभेस उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.  दरम्यान मी मागील अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या राज्याच्या सर्वोच्च सभागृहात व रस्त्यावरील लढाईत लढलो आहे. त्याचबरोबर बंजारा समाज, धनगर समाज, मुस्लिम समाज बांधवांच्या आरक्षणाच्या लढाईत सहभागी झालेलो आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या संरक्षणाच्या लढाईत देखील मी सहभागी होणार असून, सकल ओबीसी समाजाने एकजुटीने या महा एल्गार सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले असून, याव...

युवक नेते सचिनभाऊ कागदे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर

इमेज
  परळी / प्रतिनिधी – येथील  नगरपरिषद गटनेते   सचिन ईश्वर कागदे यांची “माणूसकी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य” तर्फे  दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय समाजरत्न  पुरस्कारासाठी निवड झाल्याची गौरवशाली घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.  सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच राजकीय क्षेत्रात सतत जनतेच्या भल्यासाठी, समाजातील वंचित व दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या सचिन कागदे यांच्या कार्याचा गौरव करत फाऊंडेशनने त्यांची राज्यस्तरीय सन्मानासाठी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे परळी शहराचा मान उंचावला असून, सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. परळीतील युवकांना संघटित करून सामाजिक एकजूट निर्माण करणे, सामाजिक प्रश्न सोडविणे, वंचितांना आधार देणे शैक्षणिक तसेच गरजू विद्यार्थ्यांना व नागरिकांना आवश्यक मदत उपलब्ध करून देणे अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांनी समाजामध्ये माणूसकीचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या कार्यशैलीत नेहमीच प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि लोकाभिमुखता दिसून येते. समाजरत्न  पुरस्कार वितरण समारंभ दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. 6 वा. जिल्हा परिषद पुर्णा ये...

नगरपालिका मतदार यादीत प्रचंड गोंधळ?

इमेज
  सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली निवडणूक प्रशासन कटपुतळीप्रमाणे काम करीत आहे - बहादूर भाई  परळी प्रतिनिधी.         आगामी परळी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादी मध्ये प्रचंड गोंधळ असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने याविषयी  निवडणूक आयोगाकडे आमचा आक्षेप नोंदविला होता.परंतू सत्ताधाऱ्यांच्या दबावापुढे निवडणूक प्रशासन एखाद्या कटपुतळीप्रमाणे काम करीत असल्याचेही काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी आज दिनांक 13 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.      पत्रकार परिषदेत पुढे बोलताना  काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूर भाई यांनी नगरपालिका निवडणूक प्रशासनाने कशा प्रकारे चुकीची प्रभाग रचना केली आहे हे नकाशानुसार दाखविले. एका वार्डातील मतदार दुसऱ्या वार्डात तर दुसऱ्या वर्गातील मतदार जुन्या वार्डात टाकून प्रभाग रचना बनविण्यात आली आहे. यातून सत्ताधारी नेत्यांचा पॉकेट मतदार वाढवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. यामध्ये नैसर्गिक नियमांचा वापर न करता सत्ताधाऱ्यांना अपेक्षित अशी मनमानी प्रभाग रचना बनविण्यात आली आहे. ज्य...

परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही

इमेज
  कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ यांचे आरोप, आक्षेप अर्ज निकालाची प्रत देण्याची मागणी परळी (प्रतिनिधी)  परळी नगरपालिका प्रभाग रचनेसंदर्भात विहीत नमुन्यात कॉंग्रेसच्या वतीने आक्षेप अर्ज दाखल केलेले होते.या आक्षेप अर्जाबाबतचा निकाल काय आहे ते न कळवता परळी नगरपालिकेने प्रभागांची आरक्षण सोडत जाहिर केलेली असुन नगरपालिका मुख्याधिकार्यांनी आक्षेप प्रभाग रचना अर्जाबाबतच्या निकालाची प्रत द्यावी अशी मागणी करत याबाबत कायदेशिर दाद मागणार असल्याचे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ उर्फ बहादूरभाई यांनी सांगितले.   प्रभाग रचनेबाबत कॉंग्रेसच्या वतीने पक्षाच्या वतीने विहीत नमुन्यात आक्षेप नोंदविण्यात आला होता त्यानुसार दि.४ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली होती परंतु  त्या सुनावणीचा निकाल आपल्या नगरपालिका कार्यलयाकडून अध्याप मिळालेले नाहीत.यातच दि.८ ऑक्टोबर रोजी प्रभाग आरक्षण सोडत करण्यात आली.जाणुन बुजून निकाल न कळवता प्रभाग आरक्षण सोडत घेत एकप्रकारे हुकुमशाही सुरु केली आहे.आक्षेप नोंदवलेल्या प्रभागात दुरुस्ती झाली की नाही प्रभाग रचना कश्या प्रकारे आहे ते प्रसिध्द न करता प्रभाग आरक...