परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही



 कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ यांचे आरोप, आक्षेप अर्ज निकालाची प्रत देण्याची मागणी


परळी (प्रतिनिधी)
 परळी नगरपालिका प्रभाग रचनेसंदर्भात विहीत नमुन्यात कॉंग्रेसच्या वतीने आक्षेप अर्ज दाखल केलेले होते.या आक्षेप अर्जाबाबतचा निकाल काय आहे ते न कळवता परळी नगरपालिकेने प्रभागांची आरक्षण सोडत जाहिर केलेली असुन नगरपालिका मुख्याधिकार्यांनी आक्षेप प्रभाग रचना अर्जाबाबतच्या निकालाची प्रत द्यावी अशी मागणी करत याबाबत कायदेशिर दाद मागणार असल्याचे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ उर्फ बहादूरभाई यांनी सांगितले.
  प्रभाग रचनेबाबत कॉंग्रेसच्या वतीने पक्षाच्या वतीने विहीत नमुन्यात आक्षेप नोंदविण्यात आला होता त्यानुसार दि.४ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली होती परंतु  त्या सुनावणीचा निकाल आपल्या नगरपालिका कार्यलयाकडून अध्याप मिळालेले नाहीत.यातच दि.८ ऑक्टोबर रोजी प्रभाग आरक्षण सोडत करण्यात आली.जाणुन बुजून निकाल न कळवता प्रभाग आरक्षण सोडत घेत एकप्रकारे हुकुमशाही सुरु केली आहे.आक्षेप नोंदवलेल्या प्रभागात दुरुस्ती झाली की नाही प्रभाग रचना कश्या प्रकारे आहे ते प्रसिध्द न करता प्रभाग आरक्षण सोडत जाहिर करणे बेकायेदेशीर असुन लोकशाहीच्या विरुद्ध आहे.आम्ही नोंदवलेले आक्षेप अर्ज जर निकाली काढले असतील तर त्याची नक्कल द्यावी अशी मागणी करून याबाबत  कायेदेशीर कार्यवाही करणार असल्याचे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ उर्फ बहादूरभाई यांनी सांगितले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे