युवक नेते सचिनभाऊ कागदे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर


 परळी / प्रतिनिधी –

येथील  नगरपरिषद गटनेते   सचिन ईश्वर कागदे यांची “माणूसकी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य” तर्फे  दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय समाजरत्न  पुरस्कारासाठी निवड झाल्याची गौरवशाली घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. 
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच राजकीय क्षेत्रात सतत जनतेच्या भल्यासाठी, समाजातील वंचित व दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या सचिन कागदे यांच्या कार्याचा गौरव करत फाऊंडेशनने त्यांची राज्यस्तरीय सन्मानासाठी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे परळी शहराचा मान उंचावला असून, सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
परळीतील युवकांना संघटित करून सामाजिक एकजूट निर्माण करणे, सामाजिक प्रश्न सोडविणे, वंचितांना आधार देणे शैक्षणिक तसेच गरजू विद्यार्थ्यांना व नागरिकांना आवश्यक मदत उपलब्ध करून देणे अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांनी समाजामध्ये माणूसकीचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या कार्यशैलीत नेहमीच प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि लोकाभिमुखता दिसून येते.
समाजरत्न  पुरस्कार वितरण समारंभ दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. 6 वा. जिल्हा परिषद पुर्णा येथे संपन्न होणार असून, त्यावेळी सचिन कागदे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल कांबळे यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
दरम्यान,  हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून माझ्यासोबत चालणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा, मित्रपरिवाराचा आणि परळीकरांचा आहे. समाजासाठी दिलेलं प्रत्येक क्षणाचं योगदान हेच खरं समाधान असल्याचे मत युवक नेते सचिन कागदे यांनी यावेळी व्यक्त केले.या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे परळीच्या सामाजिक क्षेत्राला नवा अभिमान प्राप्त झाला असून, शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक वर्गाकडून सचिन कागदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे

परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही