पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने गणेशोत्सवात बुधवारी सायंकाळी ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या प्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन

इमेज
                                        सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे ना.धनंजय मुंडेंचे आवाहन परळी  (दि. 26) - कृषिमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करून अत्यंत साध्या पद्धतीने परळी वैद्यनाथ येथे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. प्रतिवर्षी परंपरेचा एक भाग म्हणून ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार (दि. 27) रोजी परळी शहरातील हालगे गार्डन येथे सायंकाळी 8 वा. प्रसिद्ध विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या सुश्राव्य प्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या कीर्तन-प्रबोधन कार्यक्रमाचा लाभ परळी वैद्यनाथ शहरासह परिसरातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.  प्रतिवर्षी विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नाथ प्रतिष्ठाण मार्फत सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. म...

कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे व सहकारी यांच्या स्मारकाचे कॉ.सिताराम येचुरी च्या हस्ते लोकार्पण

इमेज
                                                     बीड जिल्ह्याचे मुक्तीसंग्रामातील योगदान होणार आजरामर बीड / प्रतिनिधी मराठवाडा मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बीड जिल्ह्याचे योगदान अधोरेखित करण्यासारखे असून या सर्व संग्रामात डाव्या विचाराचे प्रमुख शिलेदार असलेले स्वातंत्र्यसेनानी तथा बीड जिल्ह्याचे माजी खासदार कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे व त्यांच्या सर्व साथीदा-याचे योगदान अमूल्य असून ते कायमस्वरूपी स्मरणात रहावे व शेतकरी, कष्टकरी आणि वंचितांच्या प्रश्‍नावर संघर्ष करण्यासाठी ऊर्जा मिळावी या उद्देशाने त्यांचे भव्य स्मारक स्मारक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या जन्मभूमी मोहा येथे उभारण्यात आले असल्याची माहिती कॉ.एड.अजय बुरांडे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. बीड जिल्ह्यातील मुक्तीसंग्रामातील लढ्यात योगदान देणारे कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे आणि त्यांच्या सहकार्‍यांचे स्मारक उभारण्यात आले आहे, यासाठी आज शहरातील विश्...

मुरंबीत 16 लक्ष रूपयांच्या विकास कामांचे भूमिपुजन ;परळी मतदार संघातील प्रत्येक गावात मुलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील - शिवाजी सिरसाट

इमेज
  अंबाजोगाई - प्रतिनिधी परळी मतदार संघातील व अंबाजोगाई तालुक्यात येणार्‍या मुरंबी गावामध्ये विविध विकास कामांचे भूमिपुन सोहळा रविवार पार पडला. या भूमिपुजन प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी सिरसाट यांनी मतदार संघातील प्रत्येक गावात मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडेच्या मार्फत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी 7 लक्ष रूपयांच्या सिमेंट रस्त्याचे व 9 लक्ष रूपयांच्या पाण्याच्या जलशुद्धीकरण केंद्राचे भूमिपुजन करण्यात आले. अंबाजोगाई तालुक्यातील मुरंबी येथे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आ.निधीतुन वॉटर फिल्टर व सिमेंट रस्त्याचे भूमिपुजन माजी जिल्हापरिषद अध्यक्ष शिवाजी सिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच ज्ञानोबा जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच बाबुराव जगताप, उपसरपंच सुग्रीव देशमुख, प्रसाद देशमुख, उत्तमराव जाधव, देविदास जगताप, बाळासाहेब माने, नारायण गिरी, ज्योतीराम साळुंके, शिवाजी जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. भूमिपुजना नंतर झालेल्या कार्यक्रमात सिरसाट म्हणाले की, परळी मतदार संघा...

कंत्राटी भरती रद्द करा, सरकारी शाळांचे खाजगीकरण बंद करा या घोषणांनी परळी दुमदुमली

इमेज
                                       बौध्दजन संघर्ष समितीचा आक्रोश मोर्चा परळी उपविभागीय कार्यालयावर धडकला परळी/प्रतिनिधी   राज्य सरकारने कंत्राटी भरती तसेच सरकारी शाळांचे खाजगीकरण  याबाबत काढलेले जी. आर. रद्द करा, आरक्षण वाचवा, देश वाचवा. संविधान वाचवा, देश वाचवा आदी घोषणांनी परळी शहर दुमदमले.बौध्दजन संघर्ष समितीच्या वतीने  काढलेला आक्रोश मोर्चा परळी उपविभागीय कार्यालयावर आज दिनांक 25 रोजी धडकला. हजारो महिला,  पुरुष, भीमसैनिकांच्या उपस्थितीत हा मोर्चा संपन्न झाला. परळी तालुक्यातील एससी, एसटी, ओबीसी अल्पसंख्याक, वकील संघ, कामगार संघटना आदी समाजातील विविध संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला होता. या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे मोर्चाची सुरुवात बौद्ध समाजाच्या मुलींनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून केली. तसेच मागण्याचे निवेदनही महिलांच्या हस्ते शासनाला देण्यात आले.       बौध्दजन संघर्ष समितीच्या वतीने आरक्षणावर घाला घाल...

पंकजाताई मुंडे यांनी घेतले पुण्यातील मानाच्या पांच गणपतीसह विविध गणेशांचे दर्शन

इमेज
ठिक ठिकाणी केली आरती ; गणेश मंडळाच्या वतीने झाले जंगी स्वागत पुणे ।दिनांक २५। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज शहरातील मानाच्या पांच गणपतीसह विविध गणेशांचे दर्शन घेतले. ठिक ठिकाणी त्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. गणेश मंडळाच्या वतीने यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पुण्यातील गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. गणेशाच्या भव्य दिव्य मुर्तींचे तसेच देखाव्यांचे याठिकाणी आकर्षण असते. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पंकजाताई मुंडे यांनी आजच्या पुणे दौ-यात सायंकाळी मानाच्या पांच गणपतीपैकी पहिल्या कसबा पेठेतील गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम मंडळ, तुळशीबाग, मंडई, दगडूसेठ हलवाई, एकलव्य होस्टेल, साने गुरूजी तरूण मंडळ, साई मित्र मंडळ आदी गणेश मंडळांना भेटी देवून श्रींची आरती केली. तत्पूर्वी दुपारी जंगली महाराज रस्त्यावरील अतिथी मुलींचे वस्तीगृह येथे गणेशाची आरती त्यांच्या हस्ते झाली. आ. माधुरीताई मिसाळ, दत्तात्रय खाडे, मुरलीधर मोहोळ, सदाशिव खाडे, धिरज घाटे, अशोक मुंडे व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उप...

श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची 50 कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल-अध्यक्ष रमेशराव पाटील

इमेज
श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न परळी (प्रतिनिधी) ः- तालुक्यात नागरी सहकारी पतसंस्थेच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या येथील ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेला सरलेल्या आर्थिक वर्षात सात लाख 56 हजार 923 रूपये एवढा नफा झाला असून पतसंस्थेची 50 कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल सुरू झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रमेश हरिश्चंद्रराव पाटील यांनी दिली. या संस्थेची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.24) संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी श्री पाटील बोलत होते. सभेला संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव आडेपवार, संचालक बालासाहेब कराळे, देवराव कदम, अखिल कुरेशी, शाम गडेकर, मदन मानधने, प्रा.नरहरी लोखंडे, सुनिल चिकाटे, सुरेखा आमले, चंद्रकलाबाई बावणे, मुख्य व्यवस्थापक बालाजी भोयटे यांच्यासह संस्थेचे सभासद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश पाटील म्हणाले, सरलेल्या आर्थिक वर्षात पतसंस्थेने विविध बँकेत दोन कोटी तीन लाख 34 हजार 698 रूपयांची गुंतवणूक केली आहे. नऊ कोटी 18 लाख 93 हजार 871 रूपये कर्जाचे वाटप क...