श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची 50 कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल-अध्यक्ष रमेशराव पाटील
श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
परळी (प्रतिनिधी) ः-
तालुक्यात नागरी सहकारी पतसंस्थेच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या येथील ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेला सरलेल्या आर्थिक वर्षात सात लाख 56 हजार 923 रूपये एवढा नफा झाला असून पतसंस्थेची 50 कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल सुरू झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रमेश हरिश्चंद्रराव पाटील यांनी दिली.
या संस्थेची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.24) संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी श्री पाटील बोलत होते. सभेला संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव आडेपवार, संचालक बालासाहेब कराळे, देवराव कदम, अखिल कुरेशी, शाम गडेकर, मदन मानधने, प्रा.नरहरी लोखंडे, सुनिल चिकाटे, सुरेखा आमले, चंद्रकलाबाई बावणे, मुख्य व्यवस्थापक बालाजी भोयटे यांच्यासह संस्थेचे सभासद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश पाटील म्हणाले, सरलेल्या आर्थिक वर्षात पतसंस्थेने विविध बँकेत दोन कोटी तीन लाख 34 हजार 698 रूपयांची गुंतवणूक केली आहे. नऊ कोटी 18 लाख 93 हजार 871 रूपये कर्जाचे वाटप केले असून संस्थेकडे दहा कोटी 87 लाख 71 हजार 880 रूपयांच्या ठेवी आहेत अशी माहिती देवून संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार, ग्राहक, सभासदांचे सहकार्य व कर्मचार्यांचे परिश्रम यामुळे पतसंस्थेची प्रगतीकडे वाटचाल चालू असल्याचे श्री पाटील म्हणाले. संस्थेचे उपाध्यक्ष शंकर आडेपवार यांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल मांडला. प्रास्ताविक व अहवाल वाचन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक बी.ए.भोयटे यांनी केले. उपस्थित सभासदांनी यावेळी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. दरम्यान, यावेळी सभेत चर्चिलेल्या विषयाला उपस्थित सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली. या सभेत सभासद रामकिसन दहिभाते, अशोक लांडे, जगन्नाथ लोखंडे, ज्ञानोबा झाटे, किसन आचार्य, विठ्ठल लोखंडे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. आभार प्रदर्शन प्रा.काकडे यांनी केले. ही वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी अनिल कळंबे, प्रमोद खराडे, पांडुरंग जोगदंड, नरहरी आसेवार, राहुल मस्के, महेश बचोटे, बालाजी कदम, नामदेव मुंडे, सोमनाथ औटी, भाग्यशाला कणसे, प्रिया भोयटे, रेखा बावणे, बंडू आडबलवार, पुरूषोत्तम खरोळकर, प्रकाश शिंदे, अरुण शिंदे, बन्सी मुंदडा, शाम आडेपवार, उत्तम पांचाळ आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा