मुरंबीत 16 लक्ष रूपयांच्या विकास कामांचे भूमिपुजन ;परळी मतदार संघातील प्रत्येक गावात मुलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील - शिवाजी सिरसाट


 अंबाजोगाई - प्रतिनिधी

परळी मतदार संघातील व अंबाजोगाई तालुक्यात येणार्‍या मुरंबी गावामध्ये विविध विकास कामांचे भूमिपुन सोहळा रविवार पार पडला. या भूमिपुजन प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी सिरसाट यांनी मतदार संघातील प्रत्येक गावात मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडेच्या मार्फत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी 7 लक्ष रूपयांच्या सिमेंट रस्त्याचे व 9 लक्ष रूपयांच्या पाण्याच्या जलशुद्धीकरण केंद्राचे भूमिपुजन करण्यात आले.
अंबाजोगाई तालुक्यातील मुरंबी येथे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आ.निधीतुन वॉटर फिल्टर व सिमेंट रस्त्याचे भूमिपुजन माजी जिल्हापरिषद अध्यक्ष शिवाजी सिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच ज्ञानोबा जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच बाबुराव जगताप, उपसरपंच सुग्रीव देशमुख, प्रसाद देशमुख, उत्तमराव जाधव, देविदास जगताप, बाळासाहेब माने, नारायण गिरी, ज्योतीराम साळुंके, शिवाजी जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. भूमिपुजना नंतर झालेल्या कार्यक्रमात सिरसाट म्हणाले की, परळी मतदार संघातील प्रत्येक गावात मंत्री मुंडे यांच्या आमदार निधीतुन मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रत्येक गावामध्ये पिण्याचे शुद्ध पाणी, रस्ते, नाल्या यावर या पुढे भर देण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक स्मशानभूमी मधील सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे

परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही