दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे


 परळी दि.२७ (प्रतिनिधी)

    दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय असे प्रतिपादन भाजपच्या शहराध्यक्षा उमाताई समशेट्टे यांनी केले. त्या तेली समाज दांडिया महोत्सवात बोलत होत्या. उमाताई समशेट्टे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२६) देवीची आरती करण्यात आली
            येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री शनी मंदिरात तेली समाजाच्या वतीने तेली समाज सार्वजनिक दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दांडिया महोत्सवात भाजपच्या शहराध्यक्षा उमाताई समशेट्टे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी तेली समाज सार्वजनिक दांडिया उत्सव समितीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना उमाताई समशेट्टे म्हणाल्या की, दांडिया महोत्सव आयोजित करणे आवश्यक असून या महोत्सवात महिलांना व्यासपीठ मिळवून त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो‌. या दांडिया महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल युवानेते पवन फुटके व दांडिया उत्सव समितीचे कौतुक केले. दांडिया मध्ये महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके, छगन आप्पा क्षीरसागर, तुळशीदास सालमोटे, चंद्रशेखर फुटके, ओम सोनटक्के, प्रा मधुकर शिंदे, मलिकार्जुन साखरे, नागनाथ आप्पा भाग्यवंत, शिवशंकर जठार, विनोद आळणे तेली समाज दांडिया उत्सव समितीचे अध्यक्ष युवक नेते पवन फुटके, सोमनाथ वाघमारे, अशोक रोकडे, राजकुमार भाग्यवंत, सचिन लासे, सतिष फुटके, राहूल क्षीरसागर, सुनील क्षीरसागर, दिपक साखरे, ईश्वर राऊत, रवी अन्नपुर्णे, शंकर कौले, ईश्वर जठार, ॠषी फकिरे, ओमकार नाईक, प्रदीप पिंपळे, प्रसाद जठार उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही