मराठा आरक्षणासाठी आता आरपारचा संघर्ष अटळ!

सुप्रीम कोर्टाचा निकाल हा मराठा समाजासाठी काळा दिवस-शंकर कापसे

परळी वैजनाथ(प्रतिनिधी)ः-मराठा आरक्षणासाठी बस्स झाले शहाणपणाचे डोस, बस्स झाले सल्ले, बस्स झाला श्रेयवाद, बस्स झाले आरोप-प्रत्यारोप, बस्स झाले आपण आपल्या सरकारचे भाटगिरीपणा करणे, बस्स झाला संघटनेच्या नावाखाली नौंटकीपणा, बस्स झाले मराठा नावावर राजकारण करुन पोळया भाजायच्या, बस्स झाले समाजाला वैठीस धरायचे आता वेळ आली आहे आर-पाररची लढाई लढण्याची. मराठा तरुणांनो आता लढा तिव्र करावाच लागणार आहे.  पूर्वीपासून इतिहास आहे.  मराठयांना संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही.  आता लढता-लढता मरु पण जिंकूच आता लढा नाही तर मरा पण पाठ दाखवू नका ही आपल्याला छत्रपती शिवरायांची शिकवण आहे.
सर्व मराठा तरुणांनो आपण आपले पक्षाचे विचार, पक्षाचे जोडे बाजूला फेकून दया,  षंड म्हणून बसलात, कोणाचे विचार डोक्यात घेवून तर तुम्हाला येणारा काळ माफ करणार नाही.  आपली पोरं शेळपटासारखी आत्महत्या करु लागली हे आपण पाहिलेल आहे. शेतात शेती पिकत नाही म्हणून आपली माय-बाप आत्महत्या करत आहेत हे आपण पाहिल आहे.  यापेक्षा आता निर्णायकच लढू, आता माघार नाही.  आता आरक्षण सर्वच क्षेत्रात पाहिजे हिच मागणी राहील. ढोंगी कावळयांनी आडवे यायचा प्रयत्न केला तर त्यांना पण आडवे करुन आपणास पुढे जावे लागेल.  त्याच-त्याच किळसवाण्या बैठका, तेच तेच भाषण, तेच तेच सल्ले, तेच तेच मतलबी चेहरे, तेच याचिकाकर्ते, तेच तेच व्हिडीओ कॉन्फरन्सवाले हे आता मराठा तरुणांना नको आहे.  आता पाहिजे ती आरपारची लढाई, लढा नाही तर मरा!
या घातकी घातकी निकालाने मराठा आरक्षणावर सामाजिक संघटना म्हणून राजकीय आव आणणार्‍यांचे दौर कापून टाकलेले आहेत.  आता गोर-गरीब मराठा समाज जरी असला तरी रक्त मात्र तेच आहे.  मराठा तरुण आता मागे हटणार नाही.  मराठा आरक्षण मिळेल म्हणून अनेक निवडणुका जिंकल्या, सरकार आले, सरकार गेले, सरकारने आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने म्हणून बोंबा ठोकल्या.  प्रत्यक्षात मात्र मराठयांच्या तोंडाला पाने पुसली ही वस्तुस्थिती आहे.
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय.  आमचे मुलं पण अत्यंत हुशार आहेत.  पण आरक्षणामुळे प्रत्येक क्षेत्रात मागे पडत आहेत.  नोकरीत,बढतीत मागे पडत आहेत.  गोर-गरीब विद्यार्थ्यांना अवाच्या सव्वा शुल्क भरावे लागत आहे. या मुलांच्या आई-बापांचे संसार देशोधडीला लागत आहेत.  तरुण पोरं मार्क असताना असतांना वैद्यकीय प्रवेश मिळाला नाही म्हणून व्यसनाधीन होत आहेत.  कोणी आत्महत्या करत आहेत.  हे आता सहन होणारं नाही.  आमच्या छत्रपती शाहू महाराजांनी सर्वांना आरक्षण दिलं पण त्यांच्याच समाजाला आरक्षण देताना काही षंढ आडवे येताना दिसतात ही बाब दूर्देवी आहे.  पण आता मराठा समाज गप्प बसणार नाही.  छत्रपतींच्या  विचारांचे आम्ही वारस आहोत म्हणून शांततेत मोर्चे काढले.  शिस्तीत राहिलोत.  त्या छत्रपतीच्या विचाराच्या समाजाने काढलेल्या मोर्चाची दखल जगाने घेतली.  पण छत्रपतीच्या विचारांची दखल त्यांच्याच मातीत घेतली गेली नाही हे मातीच दूर्देव म्हणावे लागेल आणि आता यापुढे मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍याला पण जशास तसे प्रतिउत्तर दिल्याशिवाय पर्याय  असणार नाही. आता संघर्ष अटळ आहे.  मराठा समाजाच्या तरुणांनो, बांगडया भरल्या सारख्या आत्महत्या करु नका.  तुम्ही या छत्रपतीच्या पावन मातीत जन्मलेले मावळे आहात.  आता रडायच नाही, लढायच आहे.  आपल्याला आपला न्याय हक्क मिळवायचा आहे.  आता एक मराठा आणि लाख मराठा नाही तर मी मराठा  लढणारा मराठा.. !  हे घोषवाक्य ठेवून संघर्ष करायचा आहे. . . तो ही आर नाही तर पार असे मराठा आरक्षण आंदोलक प्रा.शंकर कापसे यांनी म्हटले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे

परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही