सिरसाळा येथे विनाकारण फिरणाऱ्या वर ऑंटीजन टेस्ट व दंडात्मक कार्यवाही
सिरसाळा ( प्रतिनिधि) : - बीड जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले असले तरी अनेक नागरीक रस्त्याने विनाकारण फिरत आहेत . अशा नागरीकांवर दंडात्मक कारवाई। व एंटीजन टेस्ट सुरू असून आज सकाल पासून बिना कारण कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात आला आहे . सदरील ही कारवाई ईदगाह चौक, सोनपेठ चौक अन्य ठिकाणी केली जात आहे . कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ३१ मे पर्यंत लॉकडाऊन केलेले आहे . जिल्हा प्रशासनाने ही २५ मे पर्यंत कडक निर्बंध लावले असून निर्बंध असतांनाही अनेक नागरीक रस्त्याने विनाकारण फिरत आहेत . अशा सडकफिऱ्याविरोधात कारवाईची मोहिम सुरू करण्यात आली . ज्यांना खरच अत्यावश्यक काम आहे अशांना मात्र विचारपूस करून सोडुन दिले जात आहे . जे विनाकारण फिरतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात सकाळ पासून विनाकारण फिरताना दिसतात त्यांच्याकडून २०० ते ५०० रूपये या प्रमाणे दंड वसुल करण्यात आला कारवाई करताना एपीआय एकशिंगे साहेब शिवाजी मुंडे गजानन येडलवार विष्णू फड उमेश कनकावर आदी दिसत आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा