केज उपजिल्हा रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरळीत

नागरिकांनी नियमांचे पालन करावे----डॉ बी एस सोळंके



केज दि ७(प्रतिनिधी)
शहरालगतच्या उपजिल्हा रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लसीकरण नियोजनबद्ध पद्धतीने सुरळीत चालू आहे. नागरिकांनी  नियमाचे पालन करून लसीकरण करून घ्यावे  असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक बालासाहेब सोळंके यांनी केले आहे.
रुग्णालयातील डॉ व्ही बी करपे ,रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी श्रीकृष्ण नागरगोजे
आरोग्यसेविका श्रीमती एस आर गवळी,श्रीमती एन जी घुमरे,
सरस्वती महाविद्यालयातील प्रा जे के जाधव,प्रा एच आर शिंदे,प्रा धीमधीमे आदी शिक्षक, प्राध्यापक नोंदणी करणे,ऑनलाईन करणे,आदी कामे सुरळीत करत आहेत.कर्मचाऱ्यांचा कामाचा  उत्साह सेवाभाव ,
नागरिकांचे सहकार्य यामुळे गर्दी टाळून शिस्तबद्धपणे उपलब्ध लस दिली जात आहे. मास्क शिवाय लसीकरण केंद्रावर कोणीही येऊ नये.
18 ते 45 गटातील नागरिकांनी नोंदणीनंतर संदेश आला असेल तरच लसीसाठी यावे 45 ते 60 वयोगटातील नागरिकांसाठी  लसीकरण सुरळीतपणे करण्यात येत आहे. दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध नाही.लस आल्यानंतर देण्यात येईल. उद्या केवळ कोवीशिल्ड लसीचे40 डोस उपलब्ध आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे

परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही