जय जिजाऊ ॲग्रो प्रोड्युसर कंपनी व प्रल्हाद सप्लायर कडून कोविड केंद्राला आर्थिक मदत

केज दि २०(प्रतिनिधी) तालुक्यातील बनसारोळा येथील बनेश्वर शिक्षण संस्था संचलित कोविड केअर सेंटर ला सामाजिक बांधिलकीतून जय जिजाऊ ॲग्रो प्रोड्युसर कंपनी व प्रल्हाद सप्लायर तर्फे दै. विवेक सिंधु चे संपादक श्री. अभिजीत गाठाळ यांच्या हस्ते 11000/- रु चा धनादेश बनेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भागवत गोरे व सचिव डॉ. नरेंद्र काळे यांच्या कडे सुपूर्त करण्यात आला. या वेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाळासाहेब जाधव नितिन गोरे, राहुल गोरे, गोटु काकडे, विशाल घोरपडे, बापु ठोंबरे, तुकाराम सुवर्णकार उपस्थित होते. मदतीबद्दल कोविड केअर सेंटर यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे

परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही