*माझी नाराजी काँग्रेस पक्षावर नसून पक्षातील स्वार्थी गटबाज नेत्यांवर आहे - राजकिशोर मोदी*

स्वाभिमानाची लढाई ही स्वाभिमानानेच लढणार* अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- मागील 40 वर्षांपासून काँग्रेस पक्षात एकनिष्ठेने काम करणारे आणि बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवणारे राजकिशोर मोदी हे काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सर्वत्र रंगतांना दुसून येत होती .सामान्य कार्यकर्त्यांची देखील नाराजी उफाळून येत आहे . यासाठीच आज सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात होणारी घुसमट पाहून कार्यकर्त्यांची विचार मंथन बैठक आयोजित करण्यात आली होती . या विचार मंथनासाठी बीड , धारूर , केज तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते . यामध्ये बीड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महादेव धांडे , धारूर येथील अजयसिंह दीखत , पट्टीवडगाव सर्कल चे प्रा परमेश्वर वाकडे , बरदापुर सर्कलचे शेख महेबूब ,तसेच महाराष्ट्र कापुस पणन महासंघाचे उपाध्यक्ष ऍड विष्णुपंत सोळंके , अंबाजोगाई पिपल्स बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी , उद्योजक हकीम लाला ,किशोर परदेशी , अंबाजोगाई न प चे माजी उपाध्यक्ष मनोज लखेरा , रिकबचंद सोळंके , नगरसेवक महादेव आदमाणे , धम्मपाल सरवदे , सुनील व्यवहारे , ऍड इस्माईल गवळी , ऍड मिर्झा , राजेन्द्र मोरे आदी जनासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते . या विचार मंथन बैठकीत साहित्यिक दिनकर जोशी यांनी स्वाभिमान जोपासण्यासाठी माननीय नामदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्याच धर्तीवर आपला स्वाभिमान जोपासण्यासाठीच राजकिशोर मोदी यांनी देखील काँग्रेस सोडण्याचा निर्धार केला . ज्या पक्षात योग्य सन्मान नाही त्या ठिकाणी किती काळ थांबावे अशी भावना बोलून दाखविली . या विचार मंथनासाठी आलेले नगरसेवक महादेव आदमाणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . आमचे नेते राजकिशोर मोदी यांना गेली 25 ते 30 वर्षे संघर्षच करावा लागत आहे .पक्षातील काही जेष्ठ नेते आपले दिल्लीतील वजण वापरून आलेल्या संधी हिसकावून घेत आहेत .अश्या नेत्यांचं गावपातळीवर कुठल्याही प्रकारचे कार्य नाही . सदैव काम करणाऱ्या , कार्यकर्ते यांचे हित जोपासना करणारे आम्हा सर्वांचे नेते राजकिशोर मोदी यांच्या कामात खोडा घालण्यात सदैवच धन्यता मानतात .तसेच त्यांचा स्वाभिमान कसा दुखावला जाईल याची काळजी स्वयंभू गटबाज नेते घेत असतात .तेव्हा मोदींनी आता यावर विचार करून ठोस निर्णय घ्यावा आणि आम्ही सदैव तुमच्या सोबतीला असल्याची ग्वाही दिली . विचारमंथन बैठकीत काँग्रेसचे बीड तालुका अध्यक्ष महादेव धांडे यांनी देखील आपल्या भावनाना वाट करून देताना आपल्यालाही आलेल्या कटू अनुभवाची कैफियत मांडली आणि त्यांनी देखील मोदींच्या खांद्याला खांदा लावून सोबत काम करणार असल्याची स्पस्टोक्ती दिली . यावेळी पुणे येथील उद्योजक हकीम लाला यांनी सुध्दा आपण सदैव राजकिशोर मोदी यांच्या सोबतच राहू असे सांगताना त्यांनी आपणास आणि आपल्या कुटुंबियांच्या दुःखाच्या प्रसंगी धावून येऊन केलेल्या मदतीची आठवण काढली . यावेळी गवळी समाजाचे ऍड इस्माईल गवळी यांनी देखील आपले विचार मांडले .यावेळी बोलतांना गवळी यांनी सांगितले की गेल्या निवडणुकीत आमचेच काही मुस्लिम बांधव धर्माच्या नावाखाली अभि नही तो कभी नही म्हणून भूलथापा मारीत होते आणि आताही तसेच काही करण्यासाठी धडपड करतील तेव्हा अश्या भावनिक भूलथापांना बळी न पडता आम्ही सर्वजण राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करू या आणि त्यांनाच साथ देऊ अशी ग्वाही दिली . तसेच आमच्या बांधवांनी पुकारलेले शाईनबाग आंदोलनात मोदी यांनी केलेल्या सहकार्याची आठवण देखी समाजबांधव याना करून दिली . यावेळी पट्टीवडगाव सर्कलचे ऍड वाकडे यांनी देखील एका अतिसामान्य कार्यकरत्याला तालुक्याचे अध्यक्ष पद देऊन त्याचा सम्मान केल्याचं सांगून आपण आपल्या भागातील नागरिकांसोबत नेहमी मोदी यांच्याच सोबत राहनार असल्याचे सांगितले . यावेळी राधा सहकारी ग्राहक संस्थेचे अध्यक्ष किशोर परदेशी यांनी देखील आपले विचार मांडत आपण राजकिशोर मोदी यांच्या सोबतीला राहूनच कार्य करणार असल्याचे सांगितले .ऍड मिर्झा यांनी देखील यावेळू आपल्या भावना व्यक्त केल्या . आपल्या अत्यंत भावनाविवश मनोगतात पणन महासंघाचे उपाध्यक्ष ऍड विष्णुपंत सोळंके यांनी अश्रूंना आवर घालता आला नाही , बोलताना ते अत्यंत भावून झाले होते .त्यांनी स्वार्थी नेत्यांनी राजकिशोर मोदी यांची कशी गळचेपी केली याच पाढाच वाचला .स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणूक फॉर्म भरण्यासाठी गेल्यानंतर ऐन शेवटच्या क्षणी त्यांना निवडणूकीचा फॉर्म न भरण्याचे आदेश दिले .मागच्या दोनही विधान परिषदेच्या निवडणूकितही राजकिशोर मोदी यांचे नाव जाहीर होऊनही दिल्लीत बसून कटकारस्थान करून त्यावेळेस देखील त्यांना माघार घेण्यासाठी भाग पाडले .अश्या अनेक ठिकाणी त्यांच्या स्वाभिमान दुखावण्याचा आटोकाट प्रयत्न केला .मात्र मोदींनी न डगमगता अश्या कटू प्रसंगांना देखिल आनंदाने तोंड दिले . सर्व जमलेल्या कार्यकर्त्यांच्या मनोगतास उत्तर देताना राजकिशोर मोदी यांनी कार्यकर्त्याना संयम बाळगण्याचे आवाहन केले . त्यावेळी त्यांनी आपणास काँग्रेस पक्षाने अनेक संघी दिल्या व प्रत्येक वेळी आपण त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला . यामुळे आपण काँग्रेस पक्षाच्या दोष देणार नसून या पक्षातील स्वार्थी , कारस्थानी ,आणि गटबाज पुढाऱ्यांना दोषी मानतो असे स्पस्ट केले .यावेळी त्यांनी स्व बाबूरावजी आडसकर , विलासराव देशमुख , अशोक चव्हाण , मुजफ्फर हुसेन , आणि ना अमित देशमुख यांनी आपणास काँग्रेस पक्षाच्या केलेल्या सहकार्याची आठवण काढून त्यांचे आभार व्यक्त केले . पुढे बोलताना मोदी म्हणाले की आपण विद्यार्थी दशेपासून काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर चालत आलो आहोत .मागच्या 40 ते 45 वर्ष्यापासून आपण काँग्रेस पक्षाचे पाईक असून आज राजकिशोर पापा मोदी कुणी एकटा व्यक्त नसून तो समोर बसलेला हा शेकडोचा कार्यकर्त्यांचा जनसमुदाय आहे अशी मार्मिक स्पस्टोक्ती दिली .तुम्हा सर्वांच्या साथ आणि सहकार्यामुळेच गेली तीस वर्षे अंबाजोगाई नगर परिषद ही काँग्रेस पक्षाच्या ताब्यात ठेवू शकलो . आपण राजकारण करतांना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठीच समाजकारण देखील केले . पक्षाने संधी दिली नाही म्हणून आपण रडणाऱ्या पैंकी नसून आपण लढणारे कार्यकर्ते आहोत अशी दरपोक्ती दिली . पण कुणाकडून वारंवार जर आपल्या स्वाभिमानवर घाला घातला जात असेल तर त्यावर आता विचार करावा लागेल असेही पापा मोदी यांनी सांगितले .तेव्हा आपण सर्व जेष्ठ मंडळींशी विचार विनिमय करून पुढील दिशा ठरवू असे सांगितले तेव्हा सर्व कार्यकर्ते मंडळींनी संयम बाळगावा असे आवाहनही केले . आपण केवळ अंबाजोगाईतच नव्हे तर औरंगाबाद , मुंबई , दिल्ली येथेही अंबाजोगाई शहराची मान उंचावण्यासाठी प्रयत्न करून राज्यस्तरावर अंबाजोगाई शहराचे नाव आणि ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले . आपल्या काही विरोधकानी 25 वर्ष्याची न प ची सत्ता उलटवण्याचा प्रयत्न केला मात्र अश्या वेळी देखील जनता आपल्या सोबत राहून पुन्हा नगराध्यक्ष पद हे आपणाकडे दिले आणि आठ नगरसेवक निवडून दिले मात्र त्या आठ नगरसेवकांची संख्या पंचवीस पर्यंत नेण्यात आपण यशस्वी झाल्याचे देखील म्हणाले . आज आपण सर्वजण एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलो आहोत तेथे सर्वांनाच संधी देता येणार नाही तेव्हा कुणीही नाराज किंवा दुःखी न होण्याचे आवाहन शेवटी राजकिशोर मोदी यांनी केले . या विचारमंथन बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांसह सुनील वाघळकर , सचिन जाधव , राजेश इंगोले ,राणा चव्हाण , गणेश मसने , माणिक वडवणकर , शिरीष भावठाणकार , बबन मारवाल। , शरद काळे , प्रताप देवकर , रमेश कदम , मयूर लखेरा , सनी लखेरा , अमोल मिसळ , भारत जोगदंड ,दिनेश घोडके , शुभम लखेरा , योगेश चव्हाण , अजीम जरगर , अकबर पठाण , जुनेद सिद्दीकी , रणजित पवार , अतुल कसबे , चंद्रकांत महामुनी , जावेद गवळी , सुधाकर टेकाळे , महेबूब गवळी , विशाल पोटभरे ,आदी जण उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे

परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही