ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडुन सुदामतीताई गुट्टेंचा सत्कार

परळी (प्रतिनिधी) तालुक्यातील नागापूर परिसरात ऊस लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे शेतकरी चिंतेत होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ट नेत्या सुदामती गुट्टे यांनी परिसरातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन गंगाखेड येथील गंगाखेड शुगर साखर कारखान्यास येथील शेतकऱ्यांचा ऊस गाळपास नेऊन दिलासा दिला आहे. यामुळे नागापूर येथील शेतकऱ्यांनी सुदामती गुट्टे यांचे आभार मानले आहेत. तालुक्यात ऊसाची लागवड फार मोठ्या प्रमाणावर झाली आहे. यात नागापूर येथे वाण धरण असल्याने या परिसरात अगोदरच ऊस लागवड होत असते. यंदातर पाऊस जास्त झाल्याने ऊस लागवड क्षेत्र वाढले आहे. यामुळे तालुक्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागापूर परिसरातील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुदामती गुट्टे यांची भेट घेऊन ऊसाला बारा महिने झाले तरी ऊस गाळपास जात नाही. आपण यात लक्ष घालून गंगाखेड शुगर कारखान्यास ऊस गाळपासाठी नेऊन सहकार्य करावे.याची दखल घेत सुदामती गुट्टे यांनी गंगाखेड शुगरची यंत्रणा या परिसरात लावून परिसरातील ऊस गाळपासाठी नेला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याने येथील शेतकऱ्यांनी सुदामती गुट्टे यांचा बुधवारी (ता.१६) सत्कार केला व आभार मानले. यावेळी सुदामती गुट्टे यांनी सांगितले की, नागापूर व परिसरातील शेतकऱ्यांनी चिंता करु नये एकाही शेतकऱ्याचा ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही. शेतकऱ्यांनी चिंता करू नये. असे श्रीमती गुट्टे यावेळी म्हणाल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे

परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही