सुजातदादा आंबेडकर यांच्या 29 सप्टेंबरच्या एल्गार सभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा - साळवे, सरवदे


 परळी प्रतिनिधी.  वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या परळी वैजनाथ येथे दिनांक 29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भव्य एल्गार सभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम साळवे व युवक तालुकाध्यक्ष राजेश सरवदे यांनी केले आहे.

    वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांची सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी परळी येथील श्रद्धा मंगल कार्यालयात दुपारी 3  वाजता भव्य एल्गार महासभा आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेला मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय महासचिव प्रा. किसन चव्हाण ,राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद, प्रवक्ते सविताताई मुंडे, तर मुख्य अतिथी म्हणून बीड पूर्व जिल्हाध्यक्ष शैलेशभाऊ कांबळे, बीड जिल्हा पश्चिम अध्यक्ष अजय सरवदे, बीड पूर्व युवा जिल्हाध्यक्ष बाबुराव मस्के उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे असणार आहेत. 
   भव्य एल्गार महासभेचे आयोजक म्हणून परळी तालुका अध्यक्ष गौतम साळवे तसेच परळी तालुका युवा अध्यक्ष राजेश सरवदे हे आहेत. या बीड जिल्हा पश्चिम महासचिव खंडूनाना जाधव, बीड जिल्हा उपाध्यक्ष प्रसेन्नजीत रोडे, बीड जिल्हा सहसचिव एडवोकेट संजय रोडे, बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर, बीड जिल्हा उपाध्यक्ष सचिन उजगरे, बीड जिल्हा उपाध्यक्ष धम्मानंद कासारे, बीड जिल्हा उपाध्यक्ष धनराज सोनवणे उपस्थित राहणार आहेत.या सभेचे निमंत्रक  म्हणून शहर युवा अध्यक्ष प्रेम जगतकर ,युवा महासचिव ज्ञानेश्वर गीते, परळी तालुका उपाध्यक्ष विजय झिंझुर्डे, परळी तालुका उपाध्यक्ष सुभाष रोडे, शहर उपाध्यक्ष धम्मानंद क्षीरसागर, शहर उपाध्यक्ष नंदकुमार सावंत, उपाध्यक्ष संदीप ताटे हे आहेत.
‌.      ‌ भव्य एल्गार सभेच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील प्रसिद्ध  शाहीर शीतल साठे यांचा नवयान महाजलसा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या सभेला परळी तालुक्यातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम साळवे तसेच युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश सरवदे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे

परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही