कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा - आ.डॉ.गुट्टे


 गंगाखेड येथे तारू मोहल्ल्यातील नागरिकांशी साधला संवाद 


मकरंद चिनके- गंगाखेड 

मराठवाड्यासह जिल्हाभर पडणारा पाऊस अजूनही थांबलेला नाही. पुढचे काही दिवस परिस्थिती अशीच राहाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. त्यामुळे काळजी घेणे आणि सतर्क राहाणे, हेच आपल्या हातात आहे. संकट मोठे आहे, पण त्याला सर्वांनी मिळून सामोरे जायला हवे. म्हणून स्वतःसह आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. गरज असेल, तरच घराबाहेर पडा. मी स्वतः आणि प्रशासन कायम आपल्यासोबत असल्याचे जनतेला आवाहन करत संभाव्य परिस्थिती किंवा धोका लक्षात घेऊन कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

शहरातील तारू मोहल्ला येथे भेट देऊन स्थानिक पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर उपस्थित नागरिक व अधिकाऱ्यांशी ते बोलत होते. परिस्थिती भयानक आहे. त्यामुळे आपल्या स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्या. सतर्क रहा सुरक्षित रहा. गरज असेल, तर स्थलांतरित होण्याची मानसिकता ठेवा, असेही आवाहन त्यांनी केले. शिवाय, परिस्थितीकडे लक्ष देऊन राहा. वेळोवेळी माहिती घेत राहा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत, काळजी करू नका, जे व्हायचे ते झाले आता यातून बाहेर पडण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन या परिस्थितीला सामोरे जाऊ असे सांगितले. आपल्या मतदारसंघासह जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. लोक एकमेकांना मदतीचा हात देत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनानेही माणुसकीने काम करावे. पंचनामे योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे आणि कोणताही नागरिक मदतीपासून वंचित राहू नये. नुकसानग्रस्तांच्या पंचनाम्यात कसलाही दुजाभाव करू नका. प्रशासनाने नागरिकांसोबत माणुसकीने वागावे. दुजाभाव झाला असेल, अशी तक्रार आली, तर त्वरित सुधारणा करावी, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी नमूद केले. 

याप्रसंगी तहसीलदार उषाकिरण शृंगारे, नगरपालिका मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, जिल्हासंपर्कप्रमुख बालाजी मुंडे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष इकबाल चाऊस, शहराध्यक्ष अकबर सय्यद, माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे,माजी नगरसेवक सत्यपाल साळवे,  दीपक तापडिया, वैजनाथ टोले, उद्धव शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक व प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे

परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही