श्री दत्तात्रय भंडारे यांना बेस्ट फार्मासिस्ट अवॉर्ड ने सन्मानित


 वडवणी : प्रतिनिधी


 दि. २५  रोजी हॉटेल यशोदा बीड येथे २५ सप्टेंबर या दिवशी जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा करण्यात आला. आणि अनेक फार्मासिस्टना सन्मानित करण्यात आले.  महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटना बीड च्या वतीने फार्मासिस्टची 'बेस्ट  फार्मासिस्ट' म्हणून वडवणी शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील ॵषध निर्माण अधिकारी  दत्तात्रय किसनराव भंडारे यांची निवड करण्यात आली.व,  बेस्ट  फार्मासिस्ट अवाॅर्ड श्री गंडाळ साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले..

 महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटना बीड च्या वतीने जागतिक फार्मीसिस्ट दिन २६ सप्टेंबर २०२५ रोजी साजरा करुन फार्मासिस्ट सन्मान समारोह आयोजित करण्यात आला.होता.२०२५ चा सर्वोत्कृष्ट फार्मासिस्ट' पुरस्कार दत्तात्रय भंडारे यांना देण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप: 
हे पुरस्कार फार्मासिस्टच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेण्यासाठी दिले जातात. यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री शेंकडे साहेब जिल्हा बाळ संगोपन अधिकारी, महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटना बीड जिल्हा अध्यक्ष योगेश जोशी साहेब यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे

परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही