अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 जळगावदि. २७ (जिमाका वृत्तसेवा): अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईलत्यासाठी नियमांची अडचण येऊ दिली जाणार नाहीअशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.

 जळगाव विमानतळावर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधतांना श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलजलसंपदा मंत्री गिरीश महाजनवस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेआमदार सुरेश भोळेमंगेश चव्हाणकिशोर पाटीलअमोल जावळेजिल्हाधिकारी आयुष प्रसादजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल  करणवाल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांचे जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यापाचोराभडगावजामनेरमुक्ताईनगरभुसावळजळगावएरंडोल या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर मदत  दिली जाईल असे त्यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेनुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानी संदर्भात निकषात कोणाला न अडविता सर्वांपर्यंत मदत पोहोचली पाहिजे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.  नुकसान भरपाईसाठी फक्त नुकसानाची नोंद असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो स्वतः काढले असतील तेदेखील मान्य करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

 नुकसानी संदर्भात राज्यातील ज्या भागांचे पंचनाम्यांचे अहवाल शासनाकडे प्राप्त झाले आहेत त्यांच्यासाठी शासनाने या अगोदर २ हजार ३०० कोटी रुपये दिले असून इतर भागांचे पंचनामे शासनास प्राप्त झाल्यावर आवश्यक मदत करण्यात येईलअशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

            अतिवृष्टीच्या आपत्ती काळात स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने  धीर देऊन मदत केल्याबद्दल  अतिवृष्टीग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांनी  समाधान व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे

परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही