दुर्गोत्सवात नारीशक्तीला महत्व,म्हणुनच दांडीयाचे आयोजन- फुलचंदराव कराड



 संत भगवानबाबा दुर्गोत्सव मंडळाच्या दांडीयात रमला महिलावर्ग

 अरविंद लाटकर यांच्या हस्ते दुर्गादेवीची आरती
परळी वै (प्रतिनिधी)
 दुर्गोत्सवात नारीशक्तीला विशेष महत्त्व असुन श्री भगवानबाबा प्रतिष्ठाणच्या वतीने पुणे, मुंबई सारख्या महानगरांप्रमाणे महिलांसाठी दांडीया कार्यक्रम आयोजीत करणे आमचे स्वप्न होते ते या दांडीया चिल आयोजीत करुन पुर्ण केल्याचे श्री भगवानबाबा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष फुलचंदराव कराड यांनी सांगितले.
  फुलचंदराव कराड संस्थापक अध्यक्ष असलेल्या श्री भगवानबाबा प्रतिष्ठाणच्या वतीने दुर्गा महोत्सवात शनिवार दि.२७ रोजी आयोजन दांडीया महोत्सवात मराठी,हिंदी एकापेक्षा एक सरस अशा गाण्यांच्या तालात परळीतील महिलावर्ग रममाण झाला होता.उपविभागिय अधिकारी अरविंद लाटकर यांच्या हस्ते दुर्गादेवीची आरती झाल्यानंतर दांडीया चिल कार्यक्रमास प्रारंभ झाला.यावेळी वकील संघाचे अध्यक्ष गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.या दांडीया चिल कार्यक्रमात फुलचंदराव कराड यांची कन्या मोनाली आंधळे,नात रेणुका राजपाल कराड यांनी भाग घेतला.परळी शहरातील मोंढा मैदानावर श्री भगवानबाबा प्रतिष्ठाणच्या वतीने दुर्गा महोत्सव मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक,प्रबोधनात्मक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे.परळी व परिसरात पावसाची संततधार सुरु असताना शनिवार दि.२७ सप्टेंबर रोजी दांडीया चिल कार्यक्रमास महिलांची मोठी उपस्थिती होती.शनिवारची दुर्गामातेची आरती परळी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांच्या हस्ते व तलाठी विष्णू गीते,बंडु तांदळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.यानंतर झालेल्या दांडीया महोत्सवात मराठी व हिंदीतील प्रसिद्ध असलेल्या गाण्यांनी ताल धरला.कार्यक्रमातील सहभागी महिला व प्रेक्षकवर्ग या गाण्यांच्या तालावर थिरकत राहिला.या दांडिया चिलसाठी प्रथम तीन हजार रुपयांचे,द्वितीय दोन हजार रुपयांचे तर तृतीय एक हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.श्री भगवानबाबा प्रतिष्ठाणच्या दुर्गा महोत्सवात रविवार दि.२८ रोजी कव्वाली समीर राज हा कार्यक्रम होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे

परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही