ऊर्जा ग्रूपचे सर्वेसर्वा माजी.नगरसेवक सय्यद समद यांचे निधन
परळी (प्रतिनिधी) – परळी शहरातील ज्येष्ठ नागरिक तथा ऊर्जा ग्रूपचे सर्वेसर्वा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते सय्यद समदसेठ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
अंत्यसंस्कार आज सायंकाळी ५ वाजता हैदरशाहवली कब्रिस्तान, नई ईदगाह रोड, इस्लामपुरा बंगला, परळी येथे करण्यात येणार आहेत. जर पाऊस सुरू असल्यास तर नमाज जनाजा त्यांच्या पार्किंग यार्ड ऊर्जा ऑफिस, झी कार्नर येथे पठण केली जाईल.
समाजकारण, व सांस्कृतिक सोबत त्यांनी परळी शहरातील उद्योग क्षेत्रात ऊर्जा ग्रुपच्या माध्यमातून मोठा काम केलेला आहे त्यांनी केलेल्या योगदानाची शहरवासीयांकडून आठवण केली जात आहे. सय्यद कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात दै. परळी प्रहार परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा