पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

१५ वर्षांपूर्वी नावाशिवाय जन्म नोंदणी झालेल्यांनी नावाची नोंदणी करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

इमेज
मुंबई, दि. २८: राज्यातील ज्या नागरिकांची अथवा त्यांच्या पाल्यांची नावाशिवाय जन्म नोंदणी झाली आणि त्याला १५ वर्षे झाली आहेत अशांनी जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंदणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, ज्या नागरिकांची अथवा त्यांच्या पाल्यांची जन्म नोंदणी नावाशिवाय झाली व त्याला १५ वर्षे झाली असतील त्यांनी अशा जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंदणी करून घ्यावी. यामध्ये सन १९६९ पूर्वीच्या जन्म नोंदणींचा देखील समावेश आहे. नावाची नोंदणी दिनांक २७ एप्रिल २०३६ पर्यन्त करता येणार आहे. त्यानंतर जन्म नोंदणीमध्ये बाळाच्या नावाची नोंदणी करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी ज्या ठिकाणी जन्माची नोंदणी केली आहे तेथे नागरीकांनी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

परळी शहरात सीसीटीव्ही यंत्रणा पडली धुळखात, शहर व ग्रामिण पोलीसांना अत्याधुनिक पेट्रोलींग वाहने द्या-चंदुलाल बियाणी

इमेज
परळी (प्रतिनिधी-) परळी शहरात प्रमुख चौक, रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या सर्व कॅमेर्‍यांचा नियंत्रण कक्ष शहर ठाण्यात आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरे पुर्णपणे बंद असून ही यंत्रणा धुळखात पडली आहे. गुन्हेगारी रोखण्यासोबत गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी असलेली अत्याधुनिक व तेवढीच उपयुक्त यंत्रणा तातडीने पुन्हा कार्यरत करावी व पोलीसांना पेट्रोलींगसाठी आधुनिक वाहने द्यावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन विकास समितीचे सदस्य चंदुलाल बियाणी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक बीड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. परळी शहरातील बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेकडे रा.कॉ. जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी बीड जिल्हा पोलीस अधिक्षकांचे एका निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. शहरात १०० पेक्षा अधिक कॅमेरे प्रमुख चौक, सर्व रस्ते तसेच सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. नव्याचे नऊ दिवस या पद्धतीने वर्षभर कॅमेरे चालू राहीले परंतु नंतर मात्र या यंत्रणेच्या उपयोगीतेकडे प्रशासनाने लक्ष...

कोरोनाच्या काळात समाज हितासाठी प्रत्येकांनी पुढाकार घ्यावा-प्रा.अतुल दुबे

इमेज
कोरोनाच्या काळात समाज हितासाठी प्रत्येकांनी पुढाकार घ्यावा-प्रा.अतुल दुबे विविध प्रभागात प्रतिकार शक्तीवर्धक औषधींचे केले वाटप परळी (प्रतिनिधी-) कोरोनाचा विषाणू संसर्गातून वाढतो आणि इतरांच्या शरिरात तो परत पसरतो. ज्या व्यक्तीला दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली त्या व्यक्तीला रोगप्रतिकार शक्ती असणे आवश्यक असून रोग होण्यापुर्वीच संसर्ग रोखणे, रोग प्रतिकार शक्ती वाढविणे अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकाने प्रतिकार शक्तीत वाढ होण्यासाठी योगासन, प्राणायाम करण्यासोबत आर्सेनिक अल्बम-३० या आयुष्यमान भारत संस्थेने प्रमाणित केलेल्या औषधींचा उपयोग करावा, असे आवाहन विद्यार्थी सेनेेचे जिल्हा प्रमुख प्रा.अतुल दुबे यांनी केले आहे. परळी शहरातील व तालुक्यातील नागरिकांची रोग प्रतिकारात्मक क्षमता वाढविणारे आर्सेनिक अल्बम ३० लिक्वीड स्वरूपात राजस्थानी मल्टीस्टेट यांच्या सौजन्याने आरोग्य मित्र संघटनेच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. या औषधाच्या वितरण भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने परळी वैजनाथ शहरातील महात्मा बसवेश्वर कॉलनी,जिरगे नगर, प्रियानगर या भागात शासनाने घालून दिलेल्या कोरोनाच्या नियमांचे पालन करू...

महाराष्ट्र वीरशैव सभा तालुका अध्यक्ष आदरणीय महादेवआपा ईटके यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतांना, वीरशैव विकास प्रतिष्ठाण अध्यक्ष श्याम बुद्रे, कुमार केदारी, विकास हालगे, दत्तात्रय गोपणपाळे, रमेश (बंडु) चौंडे, सोमनाथ गोपणपाळे, प्रकाश खोत,अमोल बुरकूल,शिवा चौंडे सचिन स्वामी

इमेज

जय जिजाऊ ॲग्रो प्रोड्युसर कंपनी व प्रल्हाद सप्लायर कडून कोविड केंद्राला आर्थिक मदत

इमेज
केज दि २०(प्रतिनिधी) तालुक्यातील बनसारोळा येथील बनेश्वर शिक्षण संस्था संचलित कोविड केअर सेंटर ला सामाजिक बांधिलकीतून जय जिजाऊ ॲग्रो प्रोड्युसर कंपनी व प्रल्हाद सप्लायर तर्फे दै. विवेक सिंधु चे संपादक श्री. अभिजीत गाठाळ यांच्या हस्ते 11000/- रु चा धनादेश बनेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भागवत गोरे व सचिव डॉ. नरेंद्र काळे यांच्या कडे सुपूर्त करण्यात आला. या वेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाळासाहेब जाधव नितिन गोरे, राहुल गोरे, गोटु काकडे, विशाल घोरपडे, बापु ठोंबरे, तुकाराम सुवर्णकार उपस्थित होते. मदतीबद्दल कोविड केअर सेंटर यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले

सिरसाळा येथे विनाकारण फिरणाऱ्या वर ऑंटीजन टेस्ट व दंडात्मक कार्यवाही

इमेज
सिरसाळा ( प्रतिनिधि) : - बीड जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले असले तरी अनेक नागरीक रस्त्याने विनाकारण फिरत आहेत . अशा नागरीकांवर दंडात्मक कारवाई। व एंटीजन टेस्ट सुरू असून आज सकाल पासून बिना कारण कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात आला आहे . सदरील ही कारवाई ईदगाह चौक, सोनपेठ चौक अन्य ठिकाणी केली जात आहे . कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ३१ मे पर्यंत लॉकडाऊन केलेले आहे . जिल्हा प्रशासनाने ही २५ मे पर्यंत कडक निर्बंध लावले असून निर्बंध असतांनाही अनेक नागरीक रस्त्याने विनाकारण फिरत आहेत . अशा सडकफिऱ्याविरोधात कारवाईची मोहिम सुरू करण्यात आली . ज्यांना खरच अत्यावश्यक काम आहे अशांना मात्र विचारपूस करून सोडुन दिले जात आहे . जे विनाकारण फिरतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात सकाळ पासून विनाकारण फिरताना दिसतात त्यांच्याकडून २०० ते ५०० रूपये या प्रमाणे दंड वसुल करण्यात आला कारवाई करताना एपीआय एकशिंगे साहेब शिवाजी मुंडे गजानन येडलवार विष्णू फड उमेश कनकावर आदी दिसत आहे

धनंजय मुंडेंचा परळीत सेवाधर्म; कोविडसेवा देणाऱ्या वाहनचालकांना मोफत कोरोना सुरक्षा किट

इमेज
परळी (दि. 14) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या आणि कोरोनाच्या प्रादुर्भावात नागरिकांना एक आधार म्हणून सुरू असलेल्या सेवाधर्म उपक्रमांतर्गत विविध कोविड मध्ये सेवा देत असलेल्या रिक्षा, रुग्णवाहिका, शववाहिका आदी वाहनांवरील चालकांना मोफत कोरोना सुरक्षा किट वाटप करण्यात आले. न.प. गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आज परळीतील रुग्णवाहतुक, रुग्णसेवा तसेच नगर परिषदेस कोरोना रुग्णाची अंत्यविधि करण्यासाठी सहकार्य करणारे वाहन चालक यांना कोरोना सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले. यावेळी नागनाथ भाग्यवंत, गणेश काळे, वैजनाथ कासार, शरीफ भाई, मुखतार सेठ, कोयला भाई, सिद्धेश्वर फड, महादेव भोसले, हनुमंत कराड, संतोष गायकवाड, योगेश पिसाळ, जावेद शेख, वैजनाथ खरोडे, नारायण गित्ते, राम पाळवदे यांच्यासह अनेक चालकांना कोरोना सुरक्षा किट देण्यात आले. यावेळी रा.कॉ. शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, युवक तालुकाअध्यक्ष संतोष शिंदे, संजय गांधी चे चेअरमन राजाभाऊ पौळ, सरचिटणीस अनंत इंगळे, शिक्षक आघाडीचे अध्यक्ष ...

बीड जिल्ह्यात शनिवाररात्रीपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन

इमेज
बीड दि.13 ( प्रतिनिधी ) जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिनांक 15 मे ते 25 मे या कालावधीत कडक  लॉकडाऊन करण्याचे आदेश आज दुपारी काढले आहेत. दहा दिवसाच्या कालावधीत वैद्यकीय सेवा वगळता सर्व प्रकारच्या आस्थापना पूर्ण वेळ बंद राहणार आहेत.सदरील आदेश शनिवारी दि.15 मे रोजी रात्री 12 पासून लागू होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशात म्हटले आहे की, दिनांक 15  मे 2021 रोजीचे रात्रीचे 12 वाजेपासून ते 25 मे 2021 रोजीचे रात्रीचे 12 वाजेपर्यंत खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.  १). दिनांक १५.०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपासून ते २५.०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० चे या दरम्यान केवळ खालील आस्थापना पूर्णवेळ सकराहतील . सर्व औषधालये ( Medical ) , दवाखाने , निदान क्लिनीक , लसीकरण केंद्र , वैद्यकिय विमा कार्यालये , फार्मास्युटिकल्स , फार्मास्युटिकल कंपन्या , इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स , वाहतुक आणि पुरवठा साखळी , लसीचे उत्पादन व वितरण , सेनिटायझासं , मास्क , वैद्यकिय उपकरणे , कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा...

गावस्तरावरून पीककर्ज वाटपाचे नियोजन करा – पालकमंत्री धनंजय मुंडे

इमेज
पालकमंत्री   धनंजय  मुंडें यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न बीड (दि. १२) :-  खरीप हंगाम २०२१ साठी बीड जिल्ह्यात १६०० कोटी पीक कर्जवाटपाचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून, कर्जमाफी झालेले शेतकरी, नवीन कर्ज मागणारे शेतकरी यांना १००% कर्ज मिळायला हवे, त्यानुसार आवश्यकता भासल्यास लक्ष्य ठरवलेली रक्कम वाढविण्यात यावी. लॉकडाऊनमुळे कर्ज प्रक्रिया खंडित होऊ नये यासाठी तलाठी, ग्रामसेवक, गटसचिव यांच्या मार्फत कर्जाचे अर्ज देणे व अर्ज व आवश्यक कागदपत्रे संकलन करणे अशी गावस्तरावरून प्रक्रिया राबवावी. असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री  धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्याची खरीप हंगाम पूर्व आढावा व नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस आ. प्रकाश दादा सोळंके, आ. बाळासाहेब आजबे काका (व्हीसी द्वारे) आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, विभागीय कृषी संचालक एल.डी. जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्र...

Dainik Parli Prahar 10-05-2021

इमेज
 

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आयसोलेशन सेंटर कोरोना रूग्णांसाठी ठरतेयं संजीवनी !

इमेज
*गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आयसोलेशन सेंटर कोरोना रूग्णांसाठी ठरतेयं संजीवनी !* *योगा, प्राणायाम, तज्ज्ञ डाॅक्टर्सची तपासणी, पौष्टिक आहारामुळे पांच रूग्ण ठणठणीत होऊन घरी परतले* परळी । दिनांक ०८ । नित्यनेमाने होणारे योगा, प्राणायामाचे धडे, तज्ज्ञ डाॅक्टर्सच्या टिमची मेहनत, आयुर्वेदिक काढयासह पौष्टिक आहार आणि  पोषक वातावरण या सर्वांमुळे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन सेंटरमधील कोरोना बाधित रूग्णांमध्ये दिवसेंदिवस सकारात्मक उर्जा निर्माण होत असून हे सेंटर कोरोना रूग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. याचाच परिणाम म्हणून सेंटर मधील पाच रूग्ण ठणठणीत बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत.    कोरोना महामारीची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या पुढाकारातून अक्षता मंगल कार्यालयात लक्षणे नसलेल्या कोरोना बाधित रूग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ३ मे पासून मोफत आयसोलेशन (विलगीकरण) सेंटर सुरू करण्यात आले आहे. पंकजाताई मुंडे हया स्वतः बाधित असताना देखील दररोज सेंटरचा आढावा घेऊन रूग्णांची काळजी घेण्याच्या सूचना  भाजपच्या पदाधिकारी व कार...

केज उपजिल्हा रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरळीत

इमेज
नागरिकांनी नियमांचे पालन करावे----डॉ बी एस सोळंके केज दि ७(प्रतिनिधी) शहरालगतच्या उपजिल्हा रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लसीकरण नियोजनबद्ध पद्धतीने सुरळीत चालू आहे. नागरिकांनी  नियमाचे पालन करून लसीकरण करून घ्यावे  असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक बालासाहेब सोळंके यांनी केले आहे. रुग्णालयातील डॉ व्ही बी करपे ,रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी श्रीकृष्ण नागरगोजे आरोग्यसेविका श्रीमती एस आर गवळी,श्रीमती एन जी घुमरे, सरस्वती महाविद्यालयातील प्रा जे के जाधव,प्रा एच आर शिंदे,प्रा धीमधीमे आदी शिक्षक, प्राध्यापक नोंदणी करणे,ऑनलाईन करणे,आदी कामे सुरळीत करत आहेत.कर्मचाऱ्यांचा कामाचा  उत्साह सेवाभाव , नागरिकांचे सहकार्य यामुळे गर्दी टाळून शिस्तबद्धपणे उपलब्ध लस दिली जात आहे. मास्क शिवाय लसीकरण केंद्रावर कोणीही येऊ नये. 18 ते 45 गटातील नागरिकांनी नोंदणीनंतर संदेश आला असेल तरच लसीसाठी यावे 45 ते 60 वयोगटातील नागरिकांसाठी  लसीकरण सुरळीतपणे करण्यात येत आहे. दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध नाही.लस आल्यानंतर देण्यात येईल. उद्या केवळ कोवीशिल्ड लसीचे40 डोस उपलब्ध आहे...

लातूरात ऑक्सिजनचा तुटवडा ! कोरोना रुग्णाच्या जीवितास धोका

इमेज
लातूरात ऑक्सिजनचा तुटवडा ! कोरोना रुग्णाच्या जीवितास धोका चार दिवसात सुधारणा करा अन्यथा भाजपातर्फे तिव्र आंदोलन               लातूर दि. ०७  - लातूर जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शासकीय वगळता सर्वच खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याने रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. बऱ्याच कोरोना रुग्णांना उपचाराच्या वेळीच सुविधा मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेव्हा शासन आणि प्रशासन यांनी याबाबत गंभीरपणे दखल घेऊन कोरोना रुग्णांची हेळसांड थांबवावी चार दिवसात सुधारणा झाली नाही तर लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड आ. अभिमन्यु पवार आणि शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.            लातूर जिल्ह्यामध्ये कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भा...

सिरसाळ्यात उभारलेल्या कै. पंडित अण्णा मुंडे 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण

इमेज
सिरसाळ्यात उभारलेल्या कै. पंडित अण्णा मुंडे 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्रामपंचायत यांचा संयुक्त उपक्रम   सिरसाळा (दि. 07) ---- : परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सिरसाळा येथे उभारण्यात आलेल्या 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर येथे उद्या पासून मोफत उपचार सुरू करण्यात येणार आहेत.  यावेळी ना. धनंजय मुंडे यांनी येथे उपलब्ध सुविधांची पाहणी केली तसेच येथे आवश्यक असलेल्या डॉक्टर्स व अन्य स्टाफ उपलब्ध करून, रुग्णांना भोजन, नाष्टा आदी व्यवस्थापन करण्याबाबत सूचना केल्या. येथे दाखल रुग्णांना नाथ प्रतिष्ठान व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने भोजनही मोफत देण्यात येणार आहे.   यावेळी परळी नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड, शिवाजी सिरसाट, पंचायत समिती सभापती पिंटू मुंडे, उपसभापती जानिमिया कुरेशी, रा. कॉ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मणतात्या पौळ, संजय गांधी नि...

न्या.एम.जी. गायकवाड आयोगाच्या शिफारशी नामंजूर का झाल्या ? महाविकास आघाडी च्या घटकांनी उत्तर द्यावे - आ.राणाजगजितसिंह पाटील

इमेज
न्या.एम.जी. गायकवाड आयोगाच्या शिफारशी नामंजूर का झाल्या ? महाविकास आघाडी च्या घटकांनी उत्तर द्यावे  - आ.राणाजगजितसिंह पाटील   उस्मानाबाद :(07)राज्यात भाजपा सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड यांच्या अध्यक्षते खाली आयोग नेमण्यात आला व या राज्य  मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशी च्या अनुषंगाने मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण देण्याचा कायदा तत्कालीन मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता. या विरुद्ध मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली व ना. फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयात योग्य पद्धतीने सरकारची बाजू मांडल्यामुळे मा. उच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या बाजूने निकाल देत कायदा वैध ठरवला होता व मा. गायकवाड आयोगाच्या शिफारशी देखील ग्राह्य धरत आरक्षणाची टक्केवारी निश्चित केली होती. त्याच काळात माननीय सर्वोच्च न्यायालयात अपील झाल्यानंतरही भाजप सरकारने अत्यंत मजबूतपणे बाजू मांडल्याने माननीय सरन्यायाधीशांनी या आरक्षणावर स्थगिती दिली नाही. महाविकास आघाडी सरकार गठित झाल्यानंतर माननीय सर्...

मराठा आरक्षणासाठी आता आरपारचा संघर्ष अटळ!

इमेज
सुप्रीम कोर्टाचा निकाल हा मराठा समाजासाठी काळा दिवस-शंकर कापसे परळी वैजनाथ(प्रतिनिधी)ः-मराठा आरक्षणासाठी बस्स झाले शहाणपणाचे डोस, बस्स झाले सल्ले, बस्स झाला श्रेयवाद, बस्स झाले आरोप-प्रत्यारोप, बस्स झाले आपण आपल्या सरकारचे भाटगिरीपणा करणे, बस्स झाला संघटनेच्या नावाखाली नौंटकीपणा, बस्स झाले मराठा नावावर राजकारण करुन पोळया भाजायच्या, बस्स झाले समाजाला वैठीस धरायचे आता वेळ आली आहे आर-पाररची लढाई लढण्याची. मराठा तरुणांनो आता लढा तिव्र करावाच लागणार आहे.  पूर्वीपासून इतिहास आहे.  मराठयांना संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही.  आता लढता-लढता मरु पण जिंकूच आता लढा नाही तर मरा पण पाठ दाखवू नका ही आपल्याला छत्रपती शिवरायांची शिकवण आहे. सर्व मराठा तरुणांनो आपण आपले पक्षाचे विचार, पक्षाचे जोडे बाजूला फेकून दया,  षंड म्हणून बसलात, कोणाचे विचार डोक्यात घेवून तर तुम्हाला येणारा काळ माफ करणार नाही.  आपली पोरं शेळपटासारखी आत्महत्या करु लागली हे आपण पाहिलेल आहे. शेतात शेती पिकत नाही म्हणून आपली माय-बाप आत्महत्या करत आहेत हे आपण पाहिल आहे.  यापेक्षा आता निर्णायकच लढू, आता माघा...