पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऊर्जा ग्रूपचे सर्वेसर्वा माजी.नगरसेवक सय्यद समद यांचे निधन

इमेज
  परळी (प्रतिनिधी) – परळी शहरातील ज्येष्ठ नागरिक तथा ऊर्जा ग्रूपचे सर्वेसर्वा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते सय्यद समदसेठ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्यसंस्कार आज सायंकाळी ५ वाजता हैदरशाहवली कब्रिस्तान, नई ईदगाह रोड, इस्लामपुरा बंगला, परळी येथे करण्यात येणार आहेत. जर पाऊस सुरू असल्यास तर नमाज जनाजा त्यांच्या पार्किंग यार्ड ऊर्जा ऑफिस, झी कार्नर येथे पठण केली जाईल. समाजकारण, व सांस्कृतिक सोबत त्यांनी परळी शहरातील उद्योग क्षेत्रात ऊर्जा ग्रुपच्या माध्यमातून मोठा काम केलेला आहे त्यांनी केलेल्या योगदानाची शहरवासीयांकडून आठवण केली जात आहे. सय्यद कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात दै. परळी प्रहार परिवार सहभागी आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
  जळगाव ,  दि. २७ (जिमाका वृत्तसेवा): अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईल ,  त्यासाठी नियमांची अडचण येऊ दिली जाणार नाही ,  अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.   जळगाव विमानतळावर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधतांना श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ,  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ,  वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे ,  आमदार सुरेश भोळे ,  मंगेश चव्हाण ,  किशोर पाटील ,  अमोल जावळे ,  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल  करणवाल आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,  यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ,  पाचोरा ,  भडगाव ,  जामनेर ,  मुक्ताईनगर ,  भुसावळ ,  जळगाव ,  एरंडोल या तालुक्यातील नुकसानग्रस्...

संत महंतांच्या मंगलमय उपस्थितीत 'बाजीराव पेट्रोलियमचे' आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन

इमेज
  भरपावसातही स्नेही, हितचिंतकांच्या शुभेच्छा व प्रेम ओसंडून वाहिले! _ परळी, प्रतिनिधी...        परळी शहराच्या सेवा क्षेत्राचे वैभव वाढविणाऱ्या  'बाजीराव पेट्रोलियम' या नावाने परळी नंदागौळ-पुस- बर्दापूर या रस्त्यावर अत्याधुनिक पेट्रोल पंप उभारण्यात आला असुन या पेट्रोल पंपाचे आज माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व संत महंतांच्या मंगलमय उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आले. भर पावसातही झालेल्या या शानदार समारंभाला परळीतील मोठ्या संख्येने विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.         ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर पासून काही अंतरावरच परळी ते नंदगौळ–पुस-बर्दापूर रोडवर, श्रद्धानंद गुरुकुल आश्रमासमोर  उभारण्यात आलेल्या बाजीराव पेट्रोलियम या भारत पेट्रोलियमच्या अत्याधुनिक पंपावर २४ तास इंधन सेवा उपलब्ध राहणार असून ग्राहकांसाठी सर्व आधुनिक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. या पेट्रोल पंपाचा शुभारंभ आज  माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.उद्घाटन प्रसंगी शांतिब्रह्म गुरुवर्य ह.भ.प.प. पू.महादेव महाराज चाकरवाडीकर, धर्मगुरू...

सुजातदादा आंबेडकर यांच्या 29 सप्टेंबरच्या एल्गार सभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा - साळवे, सरवदे

इमेज
  परळी प्रतिनिधी.  वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या परळी वैजनाथ येथे दिनांक 29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भव्य एल्गार सभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम साळवे व युवक तालुकाध्यक्ष राजेश सरवदे यांनी केले आहे.     वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांची सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी परळी येथील श्रद्धा मंगल कार्यालयात दुपारी 3  वाजता भव्य एल्गार महासभा आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेला मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय महासचिव प्रा. किसन चव्हाण ,राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद, प्रवक्ते सविताताई मुंडे, तर मुख्य अतिथी म्हणून बीड पूर्व जिल्हाध्यक्ष शैलेशभाऊ कांबळे, बीड जिल्हा पश्चिम अध्यक्ष अजय सरवदे, बीड पूर्व युवा जिल्हाध्यक्ष बाबुराव मस्के उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे असणार आहेत.     भव्य एल्गार महासभेचे आयोजक म्हणून परळी तालुका अध्यक्ष गौतम साळवे तसेच परळी तालुका युवा अध्यक्ष राजेश सरवदे हे आहेत. या बीड जिल्हा पश्चिम म...

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

इमेज
माजलगाव प्रतिनिधी  तालुक्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीची पाहणी मा अप्पर जिल्हाधिकारी मॅडम सह उपविभागीय अधिकारी माजलगाव मा गौरव इंगोले यांची खडकी मोगरा येथे भेट व पाहणी बीड जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी मा जितीन रहमान यांचा माजलगाव तालुक्यातील पुरग्रस्त गावांत दौरा, देपेगाव व गंगामसला येथे टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आदेश.   माजलगाव तालुक्यातील अतिवृष्टी पूर परिस्थिती ची पाहणी भेट दौरे आमदार प्रकाश सोळंके, व्हाईस चेअरमन मोहन जगताप,अशोक डक,जयसिंह सोळंके,नितीन नाईकनवरे, अशोक तिडके या सर्व सत्ताधारी व विरोधकांनी मिळून पाहणी केली,माजलगाव. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे व जमिनीचे अतोनात नुकसान झाले, निधी मुख्यमंत्र्याकडून जास्त प्रमाणात मंजूर करून तात्काळ निधी वाटप करावा अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे, प्रशासन व नेतेमंडळी नुसत्या कोरड्याच धावत्या भेटी देऊन गप्प,शेतकरी व गोरगरीबां चे बेहाल शासनाचा निधी कधी मिळणार ,या कडे नजर राजा उद्धार झाला आणि हाती भोपळा दिला अशी गत पाहायला मिळत आहे  

श्री दत्तात्रय भंडारे यांना बेस्ट फार्मासिस्ट अवॉर्ड ने सन्मानित

इमेज
  वडवणी : प्रतिनिधी  दि. २५  रोजी हॉटेल यशोदा बीड येथे २५ सप्टेंबर या दिवशी जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा करण्यात आला. आणि अनेक फार्मासिस्टना सन्मानित करण्यात आले.  महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटना बीड च्या वतीने फार्मासिस्टची 'बेस्ट  फार्मासिस्ट' म्हणून वडवणी शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील ॵषध निर्माण अधिकारी  दत्तात्रय किसनराव भंडारे यांची निवड करण्यात आली.व,  बेस्ट  फार्मासिस्ट अवाॅर्ड श्री गंडाळ साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले ..  महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटना बीड च्या वतीने जागतिक फार्मीसिस्ट दिन २६ सप्टेंबर २०२५ रोजी साजरा करुन फार्मासिस्ट सन्मान समारोह आयोजित करण्यात आला.होता.२०२५ चा सर्वोत्कृष्ट फार्मासिस्ट' पुरस्कार दत्तात्रय भंडारे यांना देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप:   हे पुरस्कार फार्मासिस्टच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेण्यासाठी दिले जातात. यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री शेंकडे साहेब जिल्हा बाळ संगोपन अधिकारी, महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटना बीड जिल्हा अध्यक्...

दुर्गोत्सवात नारीशक्तीला महत्व,म्हणुनच दांडीयाचे आयोजन- फुलचंदराव कराड

इमेज
  संत भगवानबाबा दुर्गोत्सव मंडळाच्या दांडीयात रमला महिलावर्ग  अरविंद लाटकर यांच्या हस्ते दुर्गादेवीची आरती परळी वै (प्रतिनिधी)   दुर्गोत्सवात नारीशक्तीला विशेष महत्त्व असुन श्री भगवानबाबा प्रतिष्ठाणच्या वतीने पुणे, मुंबई सारख्या महानगरांप्रमाणे महिलांसाठी दांडीया कार्यक्रम आयोजीत करणे आमचे स्वप्न होते ते या दांडीया चिल आयोजीत करुन पुर्ण केल्याचे श्री भगवानबाबा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष फुलचंदराव कराड यांनी सांगितले.   फुलचंदराव कराड संस्थापक अध्यक्ष असलेल्या श्री भगवानबाबा प्रतिष्ठाणच्या वतीने दुर्गा महोत्सवात शनिवार दि.२७ रोजी आयोजन दांडीया महोत्सवात मराठी,हिंदी एकापेक्षा एक सरस अशा गाण्यांच्या तालात परळीतील महिलावर्ग रममाण झाला होता.उपविभागिय अधिकारी अरविंद लाटकर यांच्या हस्ते दुर्गादेवीची आरती झाल्यानंतर दांडीया चिल कार्यक्रमास प्रारंभ झाला.यावेळी वकील संघाचे अध्यक्ष गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.या दांडीया चिल कार्यक्रमात फुलचंदराव कराड यांची कन्या मोनाली आंधळे,नात रेणुका राजपाल कराड यांनी भाग घेतला.परळी शहरातील मोंढा मैदानावर श्री भगवानबाबा प्रतिष्ठाणच्य...

दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे

इमेज
  परळी दि.२७ (प्रतिनिधी)     दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय असे प्रतिपादन भाजपच्या शहराध्यक्षा उमाताई समशेट्टे यांनी केले. त्या तेली समाज दांडिया महोत्सवात बोलत होत्या. उमाताई समशेट्टे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२६) देवीची आरती करण्यात आली .              येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री शनी मंदिरात तेली समाजाच्या वतीने तेली समाज सार्वजनिक दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दांडिया महोत्सवात भाजपच्या शहराध्यक्षा उमाताई समशेट्टे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी तेली समाज सार्वजनिक दांडिया उत्सव समितीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना उमाताई समशेट्टे म्हणाल्या की, दांडिया महोत्सव आयोजित करणे आवश्यक असून या महोत्सवात महिलांना व्यासपीठ मिळवून त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो‌. या दांडिया महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल युवानेते पवन फुटके व दांडिया उत्सव समितीचे कौतुक केले. दांडिया मध्ये महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्...

कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा - आ.डॉ.गुट्टे

इमेज
  गंगाखेड येथे तारू मोहल्ल्यातील नागरिकांशी साधला संवाद  मकरंद चिनके- गंगाखेड  मराठवाड्यासह जिल्हाभर पडणारा पाऊस अजूनही थांबलेला नाही. पुढचे काही दिवस परिस्थिती अशीच राहाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. त्यामुळे काळजी घेणे आणि सतर्क राहाणे, हेच आपल्या हातात आहे. संकट मोठे आहे, पण त्याला सर्वांनी मिळून सामोरे जायला हवे. म्हणून स्वतःसह आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. गरज असेल, तरच घराबाहेर पडा. मी स्वतः आणि प्रशासन कायम आपल्यासोबत असल्याचे जनतेला आवाहन करत संभाव्य परिस्थिती किंवा धोका लक्षात घेऊन कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.  शहरातील तारू मोहल्ला येथे भेट देऊन स्थानिक पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर उपस्थित नागरिक व अधिकाऱ्यांशी ते बोलत होते. परिस्थिती भयानक आहे. त्यामुळे आपल्या स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्या. सतर्क रहा सुरक्षित रहा. गरज असेल, तर स्थलांतरित होण्याची मानसिकता ठेवा, असेही आवाहन त्यांनी केले. शिवाय, परिस्थितीकडे लक्ष देऊन राहा. व...

ना. पंकजाताई मुंडेंनी जालन्यात उपोषण कर्ते दीपक बोऱ्हाडे यांची घेतली भेट

इमेज
  * धनगर समाजाच्या आरक्षणावर आमच्या मनात संवेदना ; समाजाला न्याय देण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका * जालना ।दिनांक २७। धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी गेल्या अकरा दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेले समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांची राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज भेट घेतली. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात आमच्या मनात संवेदना आहेत, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच यातून मार्ग निघेल असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.    राज्याच्या कॅबिनेट मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आज दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला भेट देऊन उपोषण सोडण्याची विनवणी केली. यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, मागच्या ११ दिवसांपासून दीपक बोऱ्हाडे यांचं उपोषण सुरु आहे. या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मी इथे आलेले आहे. त्यांनी केलेल्या मागण्या मागच्या ७० वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यांच्या मागण्यांसंदर्भात आमच्या संवेदना आहेत. देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेश...